आडते बाजार, डाळ मंडई सुरू करा; महसूलमंत्र्यांना साकडं

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नगर जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंदच आहे.

दरम्यान जिल्ह्यातील आडते बाजार, डाळ मंडई तातडीने सुरू करण्यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी यासाठी काँग्रेसने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना साकडे घातले आहे.

याप्रकरणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची समक्ष भेट घेऊन व्यापार्‍यांच्या प्रश्नावर चर्चा केली. अत्यावश्यक सुविधा वर्गात मोडणारी दुकाने त्याचबरोबर भाजीपाला विक्रेते यांना सूट देण्यात आली आहे.

मात्र या सगळ्यांचे ठोक विक्रेते असणारे व्यापारी हे आडते बाजार, डाळ मंडई या ठिकाणी आहेत. जोपर्यंत व्यापाऱ्यांची दुकाने उघडत नाही तोपर्यंत किराणा दुकानसाठी आवश्यक असणाऱ्या मालाचा पुरवठा सुरळीत होऊ शकत नाही. त्यासाठी आडते बाजार, डाळ मंडई सुरू करण्याची मागणी होते आहे.

महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करुन माहिती घेतली आहे. प्रशासनाला या बाबतीमध्ये व्यापाऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe