Stock Market : शेअर बाजारात अनेकांना गुंतवणूक करायला आवडते. परंतु प्रत्येकालाच त्यातून फायदा होतो असे नाही. अनेकांना यात खूप मोठी झळ सोसावी लागते, दरम्यान, मागील काही दिवसांपासून देशांतर्गत बाजारात मोठे चढ-उतार दिसत आहे. या काळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून दिला आहे.
अशातच एक शेअर बुलेट ट्रेनच्या वेगाने धावत आहे. त्याने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळवून दिला आहे. जर तुमच्याकडेही हा शेअर असेल तर तुम्हाला देखील खूप फायदा झाला असता. तुम्हाला लाखोंची कमाई करता आली असती.
बजाज हेल्थकेअरचा शेअर शेअर बाजारात चांगली कामगिरी करत आहे. अवघ्या 4 आठवड्यांमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर शुक्रवारी या शेअर्समध्ये एकूण 7.79 टक्क्यांची वाढ झाली. जर तुमच्याकडेही या कंपनीचा शेअर असता तर तुम्हालाही खूप मोठा फायदा झाला असता. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
कंपनीचा पुढचा प्लॅन
दरम्यान आता बजाज हेल्थकेअरच्या व्यवस्थापनाला असा विश्वास आहे की FY24 मध्ये कंपनीचा EBITDA 16 ते 20 टक्क्यांनी वाढू शकतो. तसेच चालू आर्थिक वर्षात निर्यात 15 ते 20 टक्क्यांनी वाढवण्याच्या योजनेवरही व्यवस्थापन काम सुरु असून कंपनी आपल्या खर्चात देखील कमालीची कपात करत आहे. मागील महिन्यात कंपनीने असे सांगितले होते की त्यांनी तारापूर युनिट्स विक्री करण्याच्या मोठा निर्णय घेतलेला आहे. बजाज हेल्थकेअरने असेही सांगितले आहे की, या युनिटला दीर्घकालीन उद्दिष्टे पूर्ण करता आले नाही.
कंपनीच्या शेअर्सनी गाठला उच्चांक
हे लक्षात घ्या की शुक्रवारी बीएसईवर बजाज हेल्थकेअर लिमिटेडचे शेअर्स 449.50 रुपयांच्या पातळीवर उघडले आहेत. परंतु काही काळानंतर कंपनीने 474 रुपयांची इंट्रा-डे उच्च पातळी गाठली आहे. बजाज हेल्थकेअर लिमिटेडचा हा 52 आठवड्यांचा उच्चांक असून मागील 6 महिन्यांत कंपनीच्या स्थितीगत गुंतवणूकदारांना तब्बल 38 टक्क्यांचा शानदार परतावा मिळाला आहे.