अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- लघुशंका करण्यासाठी थांबलेल्या चालकाच्या ताब्यातून स्कार्पिओतून आलेल्या तिघांनी ट्रक चोरून नेल्याच्या घटनेस २४ तास उलटत नाहीत तोच मुद्देमालासह तिघांना श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले.
श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा येथून मुकिंदा त्रिंबक पाचपुते यांचा दि.२२ जानेवारी रोजी मालवाहतूक ट्रक चोरीला गेला होता.
याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस अधिक तपास करत असताना पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,
सदरचा ट्रक भारत विष्णु धोत्रे , सतिष शिवाजी दरेकर, पोपट विठ्ठल आबनावे यांनी सदरचा ट्रक चोरुन नेला आहे. त्यानुसार त्यांनी पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथे सापळा रचून भारत विष्णु धोत्रे,
सतिष शिवाजी दरेकर, पोपट विठ्ठल आबनावे या तिघांना ताब्यात घेवुन त्यांना चोरीस गेलेल्या मालट्रक बाबत विचारपुस करताच त्यांनी गुन्हा कबूल करत यवत येथे लपवुन ठेवलेला
मालट्रक पोलिसांच्या ताब्यात दिला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या स्कॉर्पिओ गाडी (क्र एम.एच .१२ सी.एन. १०) सह सहा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.