ताज्या बातम्या

अजबच! गाईला गाणी ऐकवली तर होते दुधात वाढ; गाणे ऐकून गाईंनी दिले पाच लिटर एक्स्ट्रा दूध; काय आहे सत्य?

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 Milk production :- शेतीच्या अगदी सुरुवातीपासून पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry Business) केला जात आहे. आपल्या देशात शेतीला शेती पूरक व्यवसाय (Agricultural supplement business) म्हणून पशुपालनाची जोड दिली जाते.

यामुळे शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होते. अनेकदा पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडतो तरीदेखील पशुपालक शेतकरी (Livestock Farmers) पशुपालन व्यवसायाकडे पाठ फिरवीत नाही.

शेती प्रमाणेच काळाच्या ओघात पशुपालन व्यवसायात देखील मोठा आमूलाग्र बदल घडून आला आहे. शेती पूरक व्यवसाय म्हणून बघितल्या जाणाऱ्या पशुपालन व्यवसायाला आता प्राथमिक व्यवसायाचा दर्जा मिळाला आहे.

अनेक पशुपालक शेतकरी आता पशुपालन व्यवसायात आधुनिकतेची कास धरीत आहेत. पशुपालन करणारे शेतकरी दुग्ध उत्पादन (Dairy production) वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात, दुधाचे उत्पादन (Milk production) वाढावे म्हणून पशूला चांगला खुराक दिला जातो.

आतापर्यंत आपण दुग्ध उत्पादन वाढविण्यासाठी पशूला दर्जेदार आहार देणे गरजेचे असते असं ऐकलं असेल परंतु जर गाईंना गाणे ऐकवून अधिक दूध उत्पादन मिळवले जाऊ शकते असे सांगितले तर कदाचित आपला विश्वास बसणार नाही.

आमचा देखील बसला नव्हता. गाईंना गाणी ऐकवली तर खरंच दूध उत्पादन वाढते का? यामागे नेमके सत्य काय? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील.

एका तरुण शेतकऱ्याने गाणे ऐकवून गाईच्या दुधात वाढ केल्याचा प्रयोग यशस्वी केला असून याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओवर सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा केली जात आहे. दूध उत्पादन वाढवण्यासाठी पशुपालक शेतकऱ्याना नेहमीच पशूंना चांगला आहार देण्याचा सल्ला दिला जातो.

परंतु तुर्कीच्या एका पशुपालक शेतकऱ्यांने गाईच्या दूध उत्पादनात वाढ करण्यासाठी गाईंना शास्त्रीय संगीत ऐकवले. विशेष म्हणजे यामुळे गाईच्या दूध उत्पादनात वाढ झाल्याचे या तरुणाने स्पष्ट केले. तुर्कीमधील इज्जत कोकॅक नामक पशुपालक शेतकऱ्यांने ही किमया साधली आहे.

या तरुणाने गाईंना हेडफोन लावून शास्त्रीय संगीत ऐकवले. या तरुणाच्या मते, गाणे ऐकणे हे भावनिक दृष्ट्या खूपच चांगले असते. जनावरांसाठी देखील गाणे ऐकणे भावनिक दृष्ट्या चांगले असते गाणे ऐकल्यामुळे जनावरे मानसिक दृष्ट्या संतुलित राहतात आणि त्यांचे मन प्रसन्न राहते.

यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात देखील वाढ होते असे या तरुणाचा दावा आहे. इज्जत 100 गाईंचे संगोपन करत आहे. या गाई साधारण 22 लिटर दूध देत होत्या.

मात्र जेव्हा पासून या तरुणाने शास्त्रीय संगीत गाईंना ऐकवायला सुरुवात केली आहे तेव्हापासून गाईंच्या उत्पादनात वाढ झाली आहे.

या तरुणाने दावा केला की, शास्त्रीय संगीत ऐकवल्यापासून गाईच्या दूध उत्पादनात तब्बल पाच लिटरने वाढ झाली आहे सध्या त्याच्या गाई सत्तावीस लिटरपर्यंत दूध देत आहेत.

या तरुणाने यासंदर्भात एक व्हिडिओ देखील तयार केला आहे. तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठा धुमाकूळ घालत आहे.

निश्चितच तरुणाच्या या दाव्याचे आम्ही समर्थन करत नाहीत, हा एक मोठा संशोधनाचा विषय असू शकतो मात्र, तरुणाच्या या दाव्याने शास्त्रीय संगीताचा महिमा अधोरेखित केला जात आहे एवढे नक्की.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts