Sucess Story : शेतकऱ्यांचे हित साधत आहे ‘ग्रामहित’, उच्चशिक्षित दाम्पत्यांचे शेतकऱ्यांसाठी हितोपयोगी काम

Ahmednagarlive24 office
Published:

Sucess Story :बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रकारचे शोषण केले जाते. अनेक प्रकारची कारणे देऊन कमी भावाने शेतमाल खरेदी केला जातो. बऱ्याच शेतकऱ्यांना याबाबतीतले शास्त्रीय ज्ञान नसल्यामुळे आर्थिक पिळवणूक होते.

म्हणजे शेतकऱ्यांच्या असे होते की माल तर पिकवता येतो परंतु तो विकता येत नाही. एवढेच नाही तर विक्री व्यवस्थेतील असलेली जी काही पद्धत आहे यामध्ये देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असते.

याच समस्येवर उपाय म्हणून आणि शेतकऱ्यांचे शोषण होऊ नये यासाठी एक उच्चशिक्षित दांपत्याने खूप महत्त्वपूर्ण काम हाती घेतले असून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा शेतमाल हा योग्य दरात विकण्यास मदत झाली आहे आणि शोषण देखील कमी झाले आहे.

ग्रामहिताच्या माध्यमातून शेतकरी हिताचे काम

जर आपण यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर हा बहुतांशी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून याची ओळख आहे. याच जिल्ह्यातील आर्णी तालुका असून यामध्ये वरुड नावाचे गाव असून या गावातील रहिवासी असलेले पंकज महल्ले या उच्चशिक्षित तरुणांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातच राहून पूर्ण केले व नंतर यवतमाळ या ठिकाणाहून सामाजिक कार्य महाविद्यालयातून पदवी पूर्ण करून शेतीव्यवस्थेमध्ये असलेली ही जी काही शोषणाची पद्धत आहे,

या विरोधात लढण्याचे निश्चित केले. त्यांनी कास्तकार या संकल्पनेतून या शोषणाविरोधात अभियान राबवले जात होते. त्यामध्ये 2009 ते 13 या कालावधीत पंकज यांनी देखील सहभाग घेतला आणि तिथूनच त्यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली. यामध्ये त्यांची उच्चशिक्षित पत्नी श्वेता महल्ले यांनी देखील तेवढीच मोलाची साथ दिली.

त्यादेखील उच्चशिक्षित असून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन यामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आहे. त्या देखील शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना देखील याबाबतची जाणीव होती व या सगळ्या गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर असल्याकारणाने त्यांनी देखील या चळवळीत सहभाग घेतला. पुण्यामध्ये असलेल्या भरगच्च पगाराची नोकरी सोडून त्या देखील गावी आल्यावर कास्तकार या अभियानात सामील झाल्या. या अभियानातच त्यांची पंकज याच्याशी भेट झाली व एकत्रित येत त्यांनी 25 डिसेंबर 2015 ला विवाह केला.

कशी आहे ग्रामहिताची संकल्पना?

शेतकऱ्यांना जो काही शेतमाल तारण ठेवायचा असतो किंवा विकायचा असतो तो संबंधित केंद्रापर्यंत न्यावा लागतो. या केंद्रामध्ये त्या शेतीमालाचे नमुने काढले जातात व त्यांचे पृथकरण केले जाते. या संबंधीच्या ज्या काही नोंदी असतात त्या डिजिटल ॲपवर भरल्या जातात.

त्यामुळे या ॲपच्या आधारे या दर्जाच्या सोयाबीनला किती दर मिळणार आहे हे कळते. यासाठी काही प्रमाण ठरवण्यात आलेले असून जसे की सोयाबीन करिता दहा टक्के आद्रता, दोन टक्के काडीकचरा व दोन टक्के डॅमेज मटेरियल इतके प्रमाण यामध्ये ठरवले गेलेले आहे.

या ॲपवर शेतीमालाची नोंद झाल्यानंतर संबंधित मालाला कमी अथवा जास्त बाजार भाव का मिळाला तसेच त्या मागच्या कारणांचे सविस्तर अनालिसिस या अँपवर तात्काळ शेतकऱ्यांना कळते. एवढेच नाही तर जो काही शेतमाल तारण ठेवलेला असतो त्याची विक्री घरबसल्या या ॲपच्या माध्यमातून करण्याची सोय देखील उपलब्ध आहे.

समजा एखाद्या शेतकऱ्याला शेतमाल विकायचा आहे तर त्यांनी मोबाईल वरील सेल या ऑप्शन वर क्लिक केला की एक ओटीपी मिळतो आणि तो ओटीपी नमूद केल्यानंतर काही सेकंदात विक्रीची प्रक्रिया पार पडते. माल विकता यावा यासाठी थेट प्रक्रिया उद्योजकांशी करार करण्यात आला आहे.

म्हणजे साहजिकच शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. समजा शेतकऱ्यांनी शेतमाल तारण ठेवल्या तर प्रतिक्विंटल दहा रुपये प्रति महिना एवढे भाडे आणि बारा टक्के व्याजाची आकारणी केली जाते. तसेच शेतकऱ्यांनी तारण ठेवून जी काही रक्कम घेतली असेल त्याचे व्याज व तारण ठेवल्याचे भाडे याची वसुली शेतकऱ्याला शेतीमाल विक्री केल्यानंतर करावी लागते म्हणजेच ती बँकेला त्याचा तो परतावा मिळतो आणि जे काही उरलेली रक्कम असते ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.

अशा प्रकारची ही प्रक्रिया असून पंकज आणि श्वेता महल्ले यांनी विकसित केलेल्या या व्यवस्थेचा लाभ चार हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत घेतलेला आहे. एवढेच नाही तर यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात 30 ते 40 टक्के वाढ झाल्याचा देखील निष्कर्ष काढण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe