Successful Farmer : शेतीप्रधान देश भारतात आता दोन वर्ग उदयास आले आहेत. पहिला वर्ग नोकरी धंद्यासाठी शेतीला (Farming) त्यागपत्र देत आहे. तर दुसरा वर्ग शेतीसाठी नोकरी (Job) तसेच शिक्षणावर (Education) तुळशीपत्र ठेवत आहे.
या दोन वर्गात दुसरा वर्ग अधिक वरचढ होत असल्याचे चित्र आहे. इंशा रसूल देखील अशीच एक दुसऱ्या वर्गातील युवती असून तिने शिक्षणावर तुळशीपत्र ठेवत शेती व्यवसायात (Agriculture Business) इतिहास रचला आहे. ही युवती व्यवसायाने वैज्ञानिक असून, बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची विद्यार्थिनी देखील आहे.
या नवयुवक तरुणीने पर्यावरण आणि तापमान यावर बरेच काम केले असून त्यांचे काम खरंच कौतुकास्पद राहिले आहे. या नवयुवक तरुणीने मॉलिक्युलर सिग्नलिंगमध्ये पीएचडी करण्यासाठी दक्षिण कोरिययाला प्रस्थान केले होते. मात्र असे असले तरी नवयुवक तरुणीचे पीएचडी करतांना मन काही लागत नव्हते.
मग काय सेंद्रिय शेतीच्या (Organic Farming) नादात इंशाने कोरिया देशाकडे आणि आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या उज्वल भविष्याकडे पाठ फिरवली आणि आपल्या मायदेशी परतली. मायदेशी परतल्यानंतर या नवयुवक तरुणीने शेती करण्यास सुरुवात केली आणि परदेशी भाज्या पिकवून स्वतःचा एक ब्रँड बनवला. यामुळे सध्या या नवयुवक तरुणीची संपूर्ण देशात चर्चा रंगली आहे.
शेतीच्या कल्पनेने तीच जग पालटले अन आज यशस्वी महिला शेतकरी (Successful Women Farmer) बनली
मुलांच्या शालेय उपक्रमांदरम्यान, इंशाला स्ट्रॉबेरी फार्म दिसला, जिथे रंगीबेरंगी स्ट्रॉबेरीचे पीक उभे होते. हे पाहून इन्शाच्या मनात देखील शेती करण्याचा विचार आला. तिला शेतीची कल्पना सुचली, शेती करण्याचा निर्णय देखील घेतला आणि विशेष म्हणजे तिच्या पतीनेही तिला शेती करण्यासाठी प्रेरित केले.
आपला पती आपल्या पाठीशी उभा आहे म्हणून तिने भविष्यात येणाऱ्या कोणत्याच परिणामाला न घाबरता शिक्षणावर तुळशीपत्र ठेवत शेती हाती घेतली. तिने शेती करण्याचा निर्णय घेतला पण आपण सेंद्रिय शेती करायची असंचं ठरवलं. मग काय तिने सेंद्रिय शेती सुरू करण्यापूर्वी 6 महिने नियोजन आणि संशोधन केले. सेंद्रिय शेती सुरू केली आणि आज स्वतःचा ब्रँड तयार केला. या नवयुवक तरुणीने शेती क्षेत्रात केलेल्या दैदिप्यमान कामगिरी मुळे ही नवयुवती इतरांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
वडिलोपार्जित जमिनीवर सेंद्रिय शेतीला झाली सुरवात
इंशा रसूलची स्वतःची 3.5 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. सुरुवातीला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी या शेतजमिनीवर शेती कसली जात होती. नंतर सेंद्रिय शेतीचं आपले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी इंशाने या जमिनीवर सेंद्रिय शेती करण्यास सुरुवात केली. या अनुषंगाने या युवतीने सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला माहिती जमवली. बियाणे आणि खत खरेदी केल्यानंतर मजुरांच्या मदतीने आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर शेती सुरू केली.
सुरुवातीला नुकसान मात्र नंतर नफ्याकडे वाटचाल
इन्शा सांगते की, सुरुवातीच्या टप्प्यात तिला शेती व्यवसायातून खूप नुकसान झाले होते. पिकांच्या वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी खतांचा फारसा फायदा होत नव्हता, पण असे असले तरी तिने खचून न जाता शेती सुरूच ठेवली आणि शेवटी नफ्याकडे वाटचाल सुरू झाली आणि इंशाचे आयुष्य बदलले. आज इन्शाने 15 ते 20 स्थानिक शेतकर्यांना रोजगार दिला असून तीदेखील शेतीव्यवसायातून चांगली कमाई करत आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या विदेशी भाज्या आणि स्वतः तयार केलेले लोणचे विकून ती चांगला नफा कमावत आहे. तिला लवकरच कुक्कुटपालन देखील सुरू करायचे आहे.
इन्स्टाग्रामचा शेतीसाठी असा करतेय वापर
इंशा रसूल ज्या वेगळ्या पद्धतीने शेती करत आहे तशीच तिची मार्केटिंगची पद्धत देखील अतिशय अनोखी आहे. या नवयुवतीला तिने पिकवलेला सेंद्रिय भाजीपाला बाजारात जाऊन विकावा लागत नाही. कारण या तरुणीने सोशल मिडीयाचा चांगला प्रभावी वापर करून ऑनलाईन पद्धतीने भाजीपाला विकण्यास सुरुवात केली आहे. ती सांगते की, अवघ्या 24 तासांत त्यांचा भाजीपाला ऑनलाइन विकला जातो.
यासाठी इंशाने HomeGreens एक फॉर्म टू फोर्क ब्रँड नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट तयार केले आहे. निश्चितच शेतीमध्ये अनोखी कल्पना राबवण्यासोबतच या तरुणीने मार्केटिंगसाठी देखील अनोखी शक्कल लढवली असल्याने तिचा नफा दुपटीने वाढला आहे. शेतीमधून त्यांनी गेल्या वर्षी आठ लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. दरम्यान, इंशाच्या शेतातील फ्रेंच बीन्स आणि मटार लोकांना चांगलेच आवडले होते. याशिवाय टोमॅटो फार्मिंग आणि ब्लँच्ड स्वीट कॉर्नही चांगल्या दरात विकले जातात.