अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव या गावामध्ये राहणारे अनिल माधवराव गायकवाड, वय ४० वर्ष यांनी आंब्याच्या झाडाच्या फांदीला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत कृष्णा सोन्याबापु गायकवाड, वय १९ वर्ष, धंदा मजुरी, राहणार जिरेवाडी, वार्ड नंबर ६, निपाणी वडगाव यांनी श्रीरामपूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली अाहे.
त्यावरून शहर पोलिस ठाण्यांमध्ये अाकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक पवार हे करीत आहेत.