महंत नरेंद्र गिरी यांना आत्महत्या प्रकरण : ‘या व्यक्तीस झाली अटक !

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   महंत नरेंद्र गिरी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांचे शिष्य आनंद गिरी यांना अटक करण्यात आली आहे. सीओ देवबंद रजनीश उपाध्याय यांनी सहारनपूरच्या एसओजी टीमसह आनंद गिरीला हरिद्वार येथून ताब्यात घेतले आहे.

आनंद गिरी यांच्यासह टीम प्रयागराजला रवाना झाली आहे. हरिद्वार शहराचे एसपी कमलेश उपाध्याय यांनी याची पृष्टी करताना सांगितले की, ”उत्तर प्रदेश पोलीस उशिरा रात्री हरिद्वारला पोहचली होती.

हरिद्वार पोलिसांनी आनंद गिरी यांना आश्रमात आधीच नजरकैदेत ठेवले होते. या दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांच्या पथकाने दीड तासांच्या चौकशीनंतर आनंद गिरीला ताब्यात घेतले आहे.

सहारनपूर पोलीस आणि एसओजीची टीम उत्तर प्रदेशातून हरिद्वारला पोहोचली होती. या टीमने आनंद गिरीला त्यांच्यासोबत नेले”. प्रयागराजमध्ये महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर यूपी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली.

ज्यात त्यांनी त्यांचे शिष्य आनंद गिरी यांना आपल्या मृत्यूचे कारण सांगितले. त्यानंतरच पोलीस त्याला संशयित आरोपी ठरवून होते.

उत्तराखंड पोलीस सोमवारी संध्याकाळीच त्याच्या कांगरी गाझीवालीच्या आश्रमात पोहोचले आणि त्याला नजरकैदेत ठेवले. रात्री 10.30 च्या सुमारास यूपी पोलिसांच्या सहारनपूर एसओजीची टीम पोहोचली आणि बंद खोलीत चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले.

आनंद गिरीला सहारनपूर पोलिसांनी हरिद्वार येथून ताब्यात घेतले. यानंतर मंगळवारी प्रयागराजला रवाना झाले. आनंद गिरी यांच्या विरोधात प्रयागराजमध्ये महंत नरेंद्र गिरी यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts