अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- खासदार डॉ सुजय विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विशेष विमानाने रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला. या साठ्याचे वाटप बद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली.
शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेम्डेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नाही. सदर साठ्यातील इंजेक्शन त्यांनी साईबाबा संस्थान च्या रुग्णालयाला व राहता येथील सरकारी दवाखान्याला देखील देखील वाटप केले.
१०,००० रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना डॉ सुजय विखे यांनी गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातुन खरेदी केली असावी, सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा भेसळ मुक्त/ शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही, एवढा मोठा रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब देखील कुठे नाही
अश्या मुद्यांवर अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे ॲड.सतीश तळेकर यांच्या मार्फत फौजदारी याचिका दाखल करून सदर प्रकरणात खासदार डॉ सुजय विखे यांचावर रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना वाटप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी विनंती केली आहे.
आज दि. ०३.०५. २०२१ रोजी याचिकाकर्ते यांनी सदर रिट याचिकेमध्ये दुरुस्ती अर्ज दाखल करून एका वृत्तपत्रात आलेले बातमीच्या आधारे राज्यात विविध ठिकाणी राजकीय लोकांनी जसे माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शरद पवार व रोहित पवार, आमदार अमरीश पटेल यांनी कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना रेम्डेसिवीर इंजेक्शनचे वाटप केल्याबद्दल कार्यवाही करावी अशी विनंती सदर अर्जात केली आहे व त्याची सुनावणी देखील लवकरच होणार आहे.
डॉ सुजय विखे यांनी सदर याचिकेत त्यांना प्रतिवादी बनवावं व त्यांचे म्हणणे ऐकावे अशी विनंती करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. त्यांच्या वतीने असे सांगण्यात आले कि ,त्यांनी त्यांनी १७०० रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा नियमाप्रमाणे खरेदी केला व त्यातले १२०० रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा चंदीगड येथून शिर्डी येथे खाजगी विमानाने आणला.
याचिकाकर्ते यांच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला कि, सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठाची गोपनीयता पाळण्यासाठी शासकीय अधिकारी खोटे कागदपत्रे तयार करत आहेत. एकाबाजूने शासकीय यंत्रणा व डॉ . विखे चंदीगड येथून शिर्डी येथे खाजगी विमानाने आणलेले रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा एकाच कंपनीचा असल्याचे भासवत आहे .
परंतु दुसऱ्याबाजूने त्यांच्या मार्फत ३ वेगळ्या कंपनीचे रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा वितरित करण्यात येत असल्याने त्यांच्याकडे १७०० रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा व्यतिरिक्त अजून साठा असल्याचे मत याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडण्यात आले.
जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी त्यांच्या आज दाखल केलेल्या शपथपत्रात असे सांगितले आहे कि ,सदर रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा चंदीगड येथून शिर्डी येथे खाजगी विमानाने आणण्याबाबत त्यांना त्याची काही एक कल्पना नव्हती.
त्यांनी फक्त १७०० रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठा खरेदी करण्यासाठी परवानगी डॉ सुजय विखे व त्यांच्या हॉस्पिटल ला दिली होती व सदर १७०० रेम्डेसिवीर इंजेक्शन चा साठ्याची नोंद जिल्हा शैल्यचिकित्सक, अहमदनगर यांच्याकडे आहे असे सांगण्यात आले आहे.
प्रधान सचिव, गृह विभाग, मुंबई व पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या खोक्याबद्दलचे अहवाल न्यायालयात सादर केला. दरम्यान मा. उच्च न्यायालयाचे मा. न्या. आर. व्ही घुगे व मा. न्या. बी यु देबडवार यांनी वरील सर्व बाबी लक्षात घेता सदर प्रकरणाची सुनावणी ५ मे रोजी ठेवण्यात आली आहे. सदर प्रकरणात याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड.प्रज्ञा तळेकर,ॲड.अजिंक्य काळे, ॲड.उमाकांत आवटे व ॲड. राजेश मेवारा काम पाहात आहे तर शासनाच्या वतीने ॲड.डी आर काळे काम पाहत आहे.