Sukanya Samriddhi Yojana: मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे. या पैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात पैशांची बचत करू शकतात आणि तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयोग करू शकतात.
तुम्ही या योजनेत 0 ते 10 वर्षे वयोगटातील मुलीचे खाते सुरु करू शकतात. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो कि ही योजना मुलीच्या वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर परिपक्व होते. तसेच या योजनेतील गुंतवणुकीचे पैसे काढण्यासाठी मुलीचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. सध्या सरकारने या योजनेसाठी 7.6 टक्के व्याजदर निश्चित केला आहे.
अभ्यासासाठी पैसे काढता येतील
सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेले पैसे मुलीच्या शिक्षणासाठीही काढता येतील. दहावीनंतरच्या मुलीच्या शिक्षणासाठी खात्यात जमा केलेल्या शिल्लक रकमेपैकी फक्त 50 % रक्कम काढता येते. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच ही सुविधा उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला मुलीच्या शिक्षणाशी संबंधित कागदपत्रे पुरावा म्हणून द्यावी लागतील. तुम्ही हप्त्याने किंवा एकरकमी पैसे घेऊ शकता, परंतु तुम्हाला ते वर्षातून एकदाच मिळेल आणि तुम्ही पाच वर्षांसाठी हप्त्यांमध्ये पैसे काढू शकता.
मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढता येतात
सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेली रक्कम मुदतपूर्तीपूर्वीही काढता येते. मात्र यासाठी 15 वर्षे पैसे जमा करणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला ही सुविधा मिळेल. अन्यथा तुम्ही पैसे काढू शकत नाही. पैसे काढण्यासाठी विनंती अर्जासोबत मुलीचा आयडी टाकणे आवश्यक आहे.
पूर्ण पैसे कधी मिळतील?
मुलीच्या लग्नासाठी पैसे काढता येतात. परंतु खात्यात जमा केलेल्या एकूण रकमेपैकी केवळ 50 टक्के रक्कम काढता येते. लग्नानंतर एक महिना आधीपासून ते तीन महिन्यांपर्यंत पैसे काढता येतात. मात्र पूर्ण रक्कम मुलीच्या वयाची 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मिळणार आहे. मोदी सरकारने 2015 मध्ये ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ मोहिमेअंतर्गत सुकन्या समृद्धी योजना सुरू केली होती.
किती रक्कम गुंतवता येईल
या योजनेअंतर्गत तुम्ही वार्षिक 250 ते 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. पूर्वीच्या नियमानुसार, मुलीचे वय 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती स्वतःचे खाते चालवू शकते. मात्र आता मुलीला 18 वर्षे वयानंतरच चालवण्याचा करण्याचा अधिकार मिळणार आहे.
कर सवलत
यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेत 80C अंतर्गत केवळ दोन मुलींच्या खात्यावर करात सूट देण्याची तरतूद होती. तिसऱ्या मुलीला हा लाभ मिळत नव्हता. मात्र काही महिन्यांपूर्वी सरकारने हा नियम बदलला होता. आता एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली असतील तर त्या दोघांसाठी खाते उघडण्याची तरतूद आहे आणि करात सूट दिली जाईल.