अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2022 Maharashtra News :- उन्हाळी हंगामात पहिल्यांदाच सोयाबीन लागवडीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वी देखील झाला. त्यामुळे पेरणी खालील क्षेत्र वाढले आसून सोयाबीन जोमात आले आहे.
तर बियाणाची भविष्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटले आहे. बदलत्या वातावरणामुळे आणि पाऊसामुळे खरीप हंगामात पीक जोमात असताना देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले होते.
त्यामुळे खरीप हंगामात झालेले नुकसान शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात भरून काढण्याचे ठरवले. शिवाय मुबलक पाण्यामुळे ही हे शक्य झाले.
उन्हाळी सोयाबीन मुळे शेतकऱ्यांची खरिपातील बियाणांची चिंता मिटली आहे. शेतकरी बियाणांच्या बाबतीत आता स्वयंपूर्ण झाला आसून कृषी विभागाने केलेली जनजागृती शेतकऱ्यांच्या कामी आलेली आहे.
घरगुती बियाणे वापरण्यापूर्वी ते प्रमाणित आहे का नाही याची शहानिशा शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. यंदा शेतकर्याने उन्हाळी हंगामातील पीक पध्दतीमध्ये बदल करुन.
सोयाबीन आणि हरभरा यावर भर दिला आहे. पोषक वातावरण, मुबलक पाणी असतानाही खरीप हंगामाप्रमाणे सोयाबीनला उतारा पडत नाही. पण शेतकऱ्यांचा भविष्यातली बियाणाचा प्रश्न मिटला आहे.
यंदा पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी हा प्रयोग केल्याने काही बाबींमध्ये चूका झाल्या असल्याचा उत्पादनावर त्याचा परिणाम होणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले आहे.
तर सोयाबीन मुळे चांगला दिवस येतील अशी शेतकर्याला आशा आहे.