LIC Rules : जर तुम्ही आर्थिक संकटामुळे मुदत संपण्यापूर्वी LIC पॉलिसी सरेंडर करत असाल तर आधी त्याबद्दलचे नियम आणि कायदे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. पॉलिसी सरेंडर करणे याचाच अर्थ म्हणजे एलआयसी पॉलिसी मध्यभागी संपुष्टात आणणे होय.
एक पॉलिसीधारक किमान तीन वर्षानंतरच LIC पॉलिसी सरेंडर करू शकतो. तसेच हे देखील लक्षात ठेवा की जर तुम्ही तीन वर्षापूर्वी पॉलिसी सरेंडर केली तर तुम्हाला त्याचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे तुमच्यावर दुहेरी आर्थिक संकट येऊ शकते.
- जर तुम्ही अर्ज केला तर तीन वर्षांनीच पॉलिसी सरेंडर करू शकता
- तुम्ही तुमची LIC पॉलिसी मध्यंतरी बंद केली तर याला पॉलिसी सरेंडरिंग असे म्हणतात.
- तुम्हाला हे माहित असले पाहिजे की एलआयसी योजनेत तीन वर्षांनी गुंतवणूक केल्यानंतर ती बंद करण्यात येते.
- हे लक्षात घ्या की समर्पण मूल्य नियमांच्या आधारावर दिले जाते
- जर तुम्ही तुमची LIC पॉलिसी सरेंडर केली तर तुम्हाला केवळ नियमांच्या आधारावर समर्पण मूल्य दिले जाते.
- विशेष म्हणजे, जर तुम्ही तीन वर्षांसाठी एलआयसीचा प्रीमियम भरला असल्यास तुम्हाला समर्पण मूल्य मिळू शकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पॉलिसी मुदतीपूर्वी सरेंडर केली तर पॉलिसीधारकाला तोटा सहन करावा लागू शकतो. पॉलिसी मुदतपूर्तीपूर्वी सरेंडर केली तर मूल्य कमी होते. तुम्ही सलग तीन वर्षे प्रीमियम भरला तर तुम्ही भरलेल्या प्रीमियमच्या 30% रक्कम काढू शकता, तो ही पहिल्या वर्षाचा प्रीमियम वगळून.
असे करा सरेंडर
- जर तुम्ही पॉलिसी सरेंडर करणार असाल तर तुम्हाला LIC सरेंडर फॉर्म क्रमांक 5074 आणि NEFT फॉर्मची गरज असणार आहे.
- या फॉर्मसोबत तुम्हाला पॅन कार्डची प्रत आणि पॉलिसीशी निगडित गरजेची कागदपत्रे जोडावी लागणार आहे.
- इतकेच नाही तर, तुम्ही एलआयसी पॉलिसी का सोडत आहात? हे सांगावे लागेल.