Tata Motors EV : भारतीय बाजारात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने इलेक्ट्रिक कार लाँच होत आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार कोणतीही इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता, वेगवेगळ्या कंपन्याचे कार फीचर्स आणि किंमत वेगळी असते.
दरम्यान, भारतीय बाजारात प्रत्येक वर्षी टाटाच्या जबरदस्त इलेक्ट्रिक कार लाँच होत असतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कंपनीच्या कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शानदार फीचर्स, उत्तम रेंज आणि कमी किमतीत या कार तुम्ही खरेदी करू शकता.
कंपनीच्या प्रत्येक महिन्याला 8,500 ते 9,500 युनिट्सची विक्री होत आहे. जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
लाखो ईव्हीची झाली विक्री
देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा ही सध्या तिच्या एकूण विक्रीपैकी 14-15 टक्के इलेक्ट्रिक वाहनांमधून तिमाही आधारावर मिळवत आहे. या लोकप्रिय कंपनीला तब्बल एक लाख इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा टप्पा ओलांडण्यात यश आले आहे.
याबाबत टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा यांनी मुलाखतीदरम्यान असे सांगितले की, पाच वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक वाहनांची प्रत्येक महिन्याला फक्त 90 युनिट्स विक्री केली जात होती. आज ते प्रत्येक महिन्याला 8,500 ते 9,500 युनिट्सपर्यंत पोहोचले आहेत, जे जवळजवळ 100 पट आहे, हे लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाच वर्षांपूर्वी उद्योगाने एकूण 2,000 कार विकल्या असून आम्ही या वर्षी एक लाख युनिट्सच्या वार्षिक दराबद्दल बोलत आहोत. ज्यात 50 पटीने वाढ झाली आहे.
दरम्यान, येणाऱ्या पाच वर्षांत ते कमीत कमी 10 पटीने 10 लाख युनिट्सपर्यंत का वाढू नये, मी तेच म्हणेन, ही दृष्टी पूर्ण झाल्यामुळे भारतीय ग्राहकांसाठी आणि देशासाठी हा एक रोमांचक काळ असणार आहे, असे चंद्रा म्हणाले आहेत.