Cheapest Electric Car: भारतीय कार कंपनी (Indian car company) टाटा (Tata) लवकरच सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (cheapest electric car) आणू शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की कंपनी लवकरच 12.50 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीची इलेक्ट्रिक हॅचबॅक कार लॉन्च करू शकते.
Tigor EV पेक्षा स्वस्त असेल
माहितीनुसार, कंपनी लवकरच अशी इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. ज्याची किंमत Tigor EV पेक्षा कमी असेल. चालू आर्थिक वर्षात कंपनीने 50,000 ईव्ही कार विकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
EVs ची वाढती लोकप्रियता
ऑटो सेक्टरमध्ये ईव्ही कारची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. 2019 या आर्थिक वर्षात एकूण दोन हजार ईव्ही वाहनांची विक्री झाली होती, तर यावर्षी आतापर्यंत 20 हजारहून अधिक वाहनांची विक्री झाली आहे. या आर्थिक वर्षात 50 हजार वाहनांची विक्री होण्याची शक्यता आहे.
टाटा एका विशेष योजनेवर काम करत आहे
स्वदेशी कंपनी टाटा ने आत्तापर्यंत 17 हजार वाहने विकली असून FY23 मध्ये कंपनीचे 50 हजार ईव्ही वाहने विकण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी साणंद प्लांटमधून तीन लाख युनिट्सची अतिरिक्त क्षमता मिळविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
टाटा ईव्ही कार
सध्या, टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत दोन ईव्ही कार विकते. यामध्ये टाटा नेक्सॉन, टिगोर यांचा समावेश आहे. टिगोर ईव्ही एका चार्जवर 306 किमी पर्यंतची रेंज देते.
ही ईव्ही केवळ 65 मिनिटांत शून्य ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. Nexon EV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 12.49 लाख रुपये आहे.
Nexon EV ची किंमत 14.99 लाख एक्स-शोरूम पासून सुरू होते आणि फक्त 60 मिनिटांत फास्ट चार्जरने 10 ते 80 टक्के चार्ज करता येते.