Auto Expo 2023 : जगातील सर्वात मोठा वाहन मेळावा ग्रेटर नोएडा मध्ये भरवण्यात आला आहे. या वाहन मेळाव्यामध्ये अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. आणि एक से बढकर एक कार सादर केल्या जात आहेत. टाटा कंपनीने इलेक्ट्रिक कारवर जास्त भर दिल्याचे दिसत आहे.
टाटा कंपनीने सर्वात जास्त १२ वाहने या ऑटो एक्स्पो मध्ये सादर केली आहेत. यामध्ये सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे. टाटाने धुमधडाक्यात या वाहनांचे अनावरण केले आहे.
टाटा कंपनीच्या गाड्या अधिक लोकप्रिय आहेत. कंपनीकडून गाड्यांना सर्वात जास्त सुरक्षितता पुरवली जास्त असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. तसेच काही गाड्यांच्या किमती कमी असूनही भन्नाट फीचर्स देण्यात येत असल्याने टाटाच्या कार अधिक लोकप्रिय आहेत.
ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी SUV कार्स सादर केल्या आहेत. या सर्वांना टक्कर देण्यासाठी तटाने या वाहन मेळाव्यामध्ये SUV स्पेसमध्ये कार सादर केल्या आहेत.
२०२३ मधील वाहन मेळाव्यात टाटा कंपनीकडून सिएरा आणि टाटा हॅरियर इलेक्ट्रिक एसयूव्हीचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच या इलेक्ट्रिक कार ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
इलेक्ट्रिक कार डिझाईन
टाटा कंपनीकडून २ नवीन इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आल्या आहेत. यातील सिएरा कार बॉक्सी लूकसह सादर करण्यात आली आहे. बाह्य रचना या एसयूव्हीला वेगळे रूप देत आहे.
टाटा हॅरियर इलेक्ट्रिक एसयूव्ही
ही इलेक्ट्रिक कार कंपनीची ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये आणखी एक मोठी संकल्पना आहे. टाटा ज्या प्रकारे आपल्या कार इलेक्ट्रिक प्रकारांमध्ये सादर करत आहे. यावरून हे स्पष्ट होते की कंपनी या वाहनांचे इलेक्ट्रिक व्हेरियंट आणण्यासाठी आधीच तयार होती.
डिझाइन
हॅरियर इलेक्ट्रिक SUV मध्ये ऑल व्हील ड्राइव्हसह ड्युअल मोटर लेआउट आहे. मात्र, ते डिझेल आवृत्तीमध्ये उपलब्ध नाही. हॅरियर इलेक्ट्रिकमध्ये इलेक्ट्रिक कारचे घटक वापरले गेले आहेत, ज्यात फ्रंट बंपर लुक आणि नवीन अलॉय व्हील समाविष्ट आहेत. त्याच्या केबिनला सध्याच्या हॅरियरपेक्षा खूप मोठी स्क्रीन मिळते.