Offers On Tata Cars: जर तुम्ही जुलैमध्ये टाटा कार (Tata Car)खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी बचतीची ही एक उत्तम संधी आहे, कारण टाटा कंपनीने ग्राहकांसाठी कारवर 70,000 रुपये पर्यंत सूट दिली आहे. कंपनी या ऑफर्स Tiago, Altroz , Harrier, Safari आणि Nexon सारख्या मॉडेल्सवर देत आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या गाड्यांबद्दल
Tata Nexon च्या खरेदीवर ऑफर
तुम्ही Tata Nexon चे पेट्रोल व्हेरिएंट विकत घेतल्यास, तुम्ही या महिन्यात 8,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. Tata Nexon च्या डिझेल प्रकारावर 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट, विक्रेता/कर्मचाऱ्यांना 10,000 रुपयांची सूट मिळत आहे. डिझेल व्हेरियंटवर तुम्ही एकूण 15,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.
Tata Tiago च्या खरेदीवर ऑफर
टाटा टियागो कारच्या XE, XM, XT प्रकारांच्या खरेदीवर तुम्ही रु. 18,000 पर्यंत बचत करू शकता. 10,000 रुपयांची एक्सचेंज सवलत, 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 5000 रुपयांपर्यंत विक्रेता/कर्मचारी सवलत आहे. धनसू फीचर्सच्या या कारवर तुम्हाला जुलै महिन्यात ही सूट मिळणार आहे.
Tata Altroz च्या खरेदीवर ऑफर
तुम्ही Tata Altroz च्या पेट्रोल प्रकारावर विक्रेता/कर्मचारी सवलत म्हणून रु.7,500 पर्यंत आणि डिझेल प्रकारावर रु.10,000 पर्यंत बचत करू शकता.
Tata Harrier खरेदीवर ऑफर
टाटा हॅरियरवर 40,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज डिस्काउंट ऑफर केली जात आहे, तर तुम्ही कॉर्पोरेट सूट म्हणून 5,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही विक्रेते/कर्मचारी सवलतीच्या रूपात 25,000 रुपये वाचवू शकतो, अशा प्रकारे हॅरियरच्या खरेदीवर एकूण 70,000 रुपयांची बचत होईल.
Tata Safari च्या खरेदीवर ऑफर
तुम्ही Tata Safari वर Rs.40,000 पर्यंत बचत देखील करू शकता, जे तुम्हाला एक्सचेंज बोनस म्हणून ऑफर केले जाईल