Tea Before Workout : भारतातील प्रत्येक घरामध्ये चहाचे सेवन केले जाते, भारतात प्रत्येक घरात एक तरी असा माणूस दिसेल जो आपल्या दिवसाची सुरुवात ही चहाने करतो, अनेकदा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना चहाचे व्यसन असते, तुम्ही आत्तापर्यंत चहाबद्दल असे अनेक लेख वाचले असतील ज्यात त्याचे तोटे आणि फायदे सांगितले आहेत, पण आज आम्ही तुम्हाला चहा प्यायल्यानंतर वर्कआउट करू शकतो की नाही याबद्दल सांगणार आहोत. चहा पिल्यानंतर व्यायाम करता येतो का? या प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
आपण व्यायाम करण्यापूर्वी चहाचे सेवन केले जाऊ शकते का?
जे लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात त्यांच्या मनात सकाळच्या वर्कआऊटपूर्वी हा प्रश्न असतो, चहा पिल्यानंतर वर्कआउट करणं योग्य आहे की नाही? खरं तर चहा प्यायल्यानंतर सुमारे 1 तासानंतर वर्कआऊट करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, परंतु जर तुम्हाला फिट राहायचे असेल तर वर्कआउट करण्यापूर्वी चहा पिण्याऐवजी तुम्ही काही आरोग्यदायी गोष्टी घेऊ शकता. वर्कआउटच्या आधी तुम्ही सफरचंद, केळी, डाळिंब आणि इत्यादी फळे घेऊ शकता, याशिवाय, व्यायामाच्या अर्धा किंवा एक तास आधी तुम्ही भरपूर पाणी पियू शकता. पाण्याऐवजी तुम्ही नारळ पाणीही घेऊ शकता. सकाळी नारळ पाणी प्यायल्याने अनेक आरोग्य फायदे होतील.
व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही कोणता चहा पिऊ शकता?
ग्रीन टी
वर्कआउटच्या 1 तास आधी तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता, ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात ज्यामुळे तुमची चयापचय सुधारते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी कसरत करत असाल तर ग्रीन टी हा एक चांगला पर्याय आहे. ग्रीन टीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.
ब्लॅक टी
दुधासोबत चहा पिण्याऐवजी तुम्ही व्यायामापूर्वी ब्लॅक टी पिऊ शकता. ब्लॅक टीमध्ये साखरेचा वापर करू नका हे लक्षात ठेवा. साखर नसलेला काळा चहा तुम्हाला हायड्रेटेड ठेवेल आणि तुमच्या व्यायामादरम्यान तुम्हाला उत्साही वाटेल. काळ्या चहामध्ये लिंबू देखील वापरू शकता.
कॅमोमाइल चहा
कॅमोमाइलच्या फुलांपासून बनवलेला कॅमोमाइल चहा पिण्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. तुम्हाला बाजारात वाळलेली कॅमोमाइलची फुले सहज मिळतील, ज्यातून तुम्ही हा चहा घरी बनवू शकता. कॅमोमाइल चहामध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात, ज्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो. कसरत करण्यापूर्वी तुम्ही कॅमोमाइल चहा पिऊ शकता.