Team India : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India and Australia) यांच्यात सध्या तीन सामन्यांची T20 सीरिज (T20 series) सुरू आहे. सीरिज 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने (Australia) तर दुसरा सामना भारताने (India) जिंकला.
तर आता दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) परतला आहे त्यामुळे आता कोणत्याही एका खेळाडूची जागा संघातून कमी होणार आहे. भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांना दुसऱ्या टी-20 सामन्यात वगळण्यात आले.
पुढील महिन्यात T20 विश्वचषकही होणार आहे. यासाठी संघाची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या विश्वचषकासाठी प्लेइंग इलेव्हन जवळपास निश्चित झाले आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण खेळणार हे सर्वांना माहीत आहे. बरं, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या सीरिजदरम्यान आता दोन खेळाडूंची टी-20 कारकीर्द जवळपास संपल्याचे समोर आले आहे.
1) उमेश यादव (Umesh Yadav)
उमेश यादव तीन वर्षांनंतर टी-20 संघात परतला. अचानक त्याला परत बोलावण्यात आले. शमीला कोविड झाल्याने त्याच्या जागी उमेशला संधी देण्यात आली होती . पहिल्या टी-20 सामन्यात उमेश यादवची कामगिरी विशेष झाली नाही. आगामी सीरिजसाठी उमेश यादवची निवड झालेली नाही. तो T20 विश्वचषक संघातही नाही. या दृष्टिकोनातून पाहिल्यास आता कदाचित तो टी-20 संघात परत येऊ शकणार नाही. उमेश यादवने भारतासाठी 52 कसोटी सामन्यात 158 विकेट्स, 75 एकदिवसीय सामन्यात 106 बळी आणि 7 टी-20 सामन्यात 9 बळी घेतले आहेत.
2) मोहम्मद शमी (Mohammed Shami)
शमीची कारकीर्दही आता जवळपास संपलेली दिसते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. कोविडमुळे त्यांना बाहेर जावे लागले. त्याला टी-20 विश्वचषक संघात राखीव खेळाडू म्हणूनही ठेवण्यात आले आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नाही हे निश्चित आहे.
त्यांच्यापुढे दीपक चहर यांना स्थान देण्यात येणार आहे. असो, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह हे प्लेइंग इलेव्हनमध्ये राहतील. शमीने टीम इंडियासाठी 17 टी-20 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत.