ताज्या बातम्या

“हे काय मला सांगतायत, मी कोणती भूमिका बदलली”

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे उत्तर येथे घेतलेल्या सभेत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांवर सडकून टीका केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादीनं मला सांगावं की मी भूमिका बदलतो म्हणून? पवार साहेबांनी सांगावं? हेच पवार ज्यावेळी सोनिया गांधींना (Sonia Gandhi) परदेशी पंतप्रधान बोलले होते. खरंतर परदेशी पंतप्रधान बोलणारी पहिली व्यक्ती माननीय बाळासाहेब होते.

शरद पवार 199 ला काँग्रेसमधून बाहेर पडले कारण सोनिया गांधी परदेशी पंतप्रधान नको म्हणून. निकाल लागल्यानंतर पुन्हा सोबत गेले, कृषी मंत्री झाले. दोन महिन्यांतच भूमिका बदलली.

हे काय मला सांगतायत. मी कोणती भूमिका बदलली. हिंदुत्वाची भूमिका मी आज नाही सांगितलीये. असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

तसेच पुढे बोलताना राज ठाकरे यांनी मनसेतील मुस्लिम नेत्याला भर सभेत उभे करून मराठी मुस्लिम कसे भरडले जातात हे सांगितले आहे. ते म्हणाले, सलीम मामू शेख बसलेत इथे.. उभा राहा.. असे सांगितले. याच्या मतदारसंघात 95 टक्के हिंदू लोकं राहतात,

पण सलीम निवडून आला. याचं कारण हे मराठी मुसलमान. या देशातले प्रामाणिक मुसलमान, पण ते या लोकांमुळे भरडले जात आहेत. अतिरेकी लोकांमुळे भरडले जात आहेत असेही राज म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी मनसे पक्षाचे कौतुक देखील केल्याचे दिसत आहे. पाकिस्तानी कलावंताना ढुंगणावर लाथ मारणारा पक्ष कोणता होता, हे आठवा. हे आपल्याकडे येऊन गाणी गात होते, चित्रपटात काम करत होते, यांना हाकलवणारा माझे मनसैनिक होते.

रझा अकादमीविरोधात मोर्चा काढला. आमच्या पोलिस भगिनींनी मारले, घोळका घोळका करुन त्यांना घ्यायचे. त्यांना शारिरीक त्रास दिला. पत्रकारांच्या गाड्या फोडल्या, जाळल्या. कुणी प्रतिक्रिया नाही दिली. मनसेनं फक्त मोर्चा काढला.

मुंबईचे कमिशनर अरुण पटनायक पोलिसांनाच सांगायला लागले की यांना मारायचं नाही. त्यांना काहीही करायचं नाही. हा मोर्चा मुळात अरुण पटनायकांना कमिशनर पदावरुन काढण्यासाठी होता.

त्यांना सरकारला काढावंच लागलं होतं. अगोदरच्या गोष्टी विसरुन गेला असाल, तर आठवण करुन देतो. गुढीपाडव्याच्या सभेनंतर एकदम पुढे आले असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts