अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-रस्त्यावर उभ्या असलेल्या आयशर टेम्पो चे टायर चोरले. या गुन्ह्यात अटकही झाली.
पण न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर फरार झालेला आरोपी तब्बल दहा वर्षानंतर पोलिसांच्या हाती लागला न्यायालयाने आरोपीच्या विरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केली. दीपक मारुती जाधव (३७, रा. गजराजनगर, नगर) असे या आरोपीचे नाव आहे.
२०१० मध्ये एमआयडीसी परिसरात साईबन रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोचे टायर चोरून नेल्याबाबत आरोपी दीपक याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला अटकही झाली.
पण न्यायालयाने त्याला जामिनावर मुक्त करताच तो फरार झाला एक दोन दिवस नव्हे तर तीन महिने नव्हे तर तब्बल दहा वर्षे तो फरार होता
जिल्हा न्यायालयाने त्याला हजर करण्याबाबतचे आदेश पोलिसांना बजावले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी आरोपीचा शोध घेतला त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे,
उपनिरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल संदीप घोडके, संदीप पवार, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, कमलेश पाथरूट, योगेश सातपुते आदींच्या पथकाने आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले