‘त्या’ पोलीस कर्मचार्‍यांची तात्पुरत्या स्वरूपात निलंबनातून मुक्तता

अहमदनगर Live24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  जिल्हा पोलीस दलातील निलंबित झालेल्या दोन सहायक पोलीस निरीक्षक व तीन पोलीस कर्मचार्‍यांची तात्पुरत्या स्वरूपात निलंबनातून मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, तत्कालिन नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग रजपूत यांना 16 फेब्रुवारीला निलंबित केले होते. त्यांना आता राहुरी पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे.

तसेच सहायक निरीक्षक दिलीप राठोड यांना 13 एप्रिल रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांना आता कर्जत पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे. तसेच निलंबित झालेले पोलीस हवालदार संतोष वाघ यांना पोलीस मुख्यालय, पोलीस हवालदार शिवनाथ बडे यांना पारनेर पोलीस ठाण्यात व पोलीस नाईक रामदास सोनवणे यांना पाथर्डी पोलीस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे.

निलंबनातुन करण्यात आलेली मुक्तता ही पुर्णत: तात्पुरत्या स्वरूपाची असून भविष्यात त्यांच्या विरूद्ध करण्यात येणार्‍या कारवाईस कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान हे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts