पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव चौफुला येथे भरधाव वेगातील ट्रक व ईटीगा कारच्या झालेल्या भीषण अपघातात एकजण ठार तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.
मृतात एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कर्जत तालुक्यातील राशीन येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विजयकुमार बनाते व कर्मचारी खाजगी कामानिमित्त पुण्याला निघाले होते.
ते पुणे सोलापूर महामार्गावर केडगाव चौफुला येथे आले असता समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने ईटीगा कारला जोरदार धडक दिली.
या अपघातात ग्रामविकास अधिकारी विजयकुमार बनाते, कर्मचारी दादा शिंदे, दया आढाव, मुकादम रवि साळवे, दीपक भोंग असे पाचजण गंभीर जखमी झाले.
जखमींना तात्काळ पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले, या पाच जणांपैकी दादा शिंदे यास ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी नेले असता येथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. तर इतरांवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.