ताज्या बातम्या

Big News : हल्ल्यात मोठे धरण फुटल्याने भीषण पूरसंकट ! अनेक गावे पाण्याखाली, हजारो लोकांना धोका; हल्ला केला कुणी ?

Big News :- दक्षिण युक्रेनमधील एक प्रमुख धरणाची भिंत आणि जलविद्युत केंद्र हल्ल्यात उदध्वस्त झाल्याने पुराने थैमान घातले आहे. धरणाजवळची अनेक गावे पाण्याखाली गेली असून, युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्राला धोका निर्माण होण्याची भीती आहे. जवळपास १० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे निदेश देण्यात आले आहेत.

अगोदच युद्धामुळे पिचलेल्या लोकांना आता पुराच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. धरणावरील हल्ल्यासाठी युक्रेन आणि रशियाने एकमेकांना जबाबदार धरले आहे. पुरामुळे पर्यावरणीय आपत्ती निर्माण होण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरून धरणावरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.

नायपर नदीवरील ‘काखोब्का’ धरण हल्ल्यात उद्‌ध्वस्त झाल्याने युद्धग्रस्त युक्रेनसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे भषण पूरस्थिती ओढावल्याचा आरोप युक्रेनने केला आहे, तर रशियन अधिकान्यांनी युक्रेनच्या हल्ल्यामुळेच हे संकट निर्माण झाल्याचा प्रत्यारोप केला आहे.

खेरसॉन भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. युक्रेनच्या गृहमंत्र्यांनी नदीजवळील १० गावांतील लोकांना आवश्यक दस्तावेज व पाळीव प्राण्यांना घेऊन सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे निर्देश दिले आहेत. पूरग्रस्त भागातील पाणीपातळी ५ ते ७ दिवसांनंतर कमी होण्याची शक्यता आहे धरण उद्ध्वस्त झाल्यानंतर समोर आलेल्या किडीओमध्ये नदीपात्रातून प्रचंड वेगाने पाणी अनेक गावांत घुसत असल्याचे दिसून येत आहे.

दोन्ही देशांनी आपापल्या नियंत्रणाखालील भूभागातील नागरिकांना हा परिसर खाली करण्याचे निर्देश दिले आहेत. धरणाचा मुख्य भाग सद्यःस्थितीत रशियाच्या ताब्यात आहे. युक्रनेचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे. यादरम्यान नोवा काखोकामध्ये रशियाकडून नियुक्त महापौर व्लादिमीर लियोनत्सेव यांनी युक्रेनचा हा हल्ला दहशतवादी कृत्व असल्याचा आरोप केला आहे.

…तर हाहाकार अटळ?
युक्रेनच्या एका स्वयंसेवी संस्थेनुसार जवळपास ५०० हून अधिक गावे व शहरांना पुराचा धोका आहे. या पुरात हजारो प्राणी आणि साधनसंपत्ती नष्ट होण्याची शक्यता आहे. पुराच्या संकटामुळे क्रीमियाच्या दक्षिण भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. शिवाय युरोपमधील सर्वात मोठे जापोरिझिया अणुऊर्जा केंद्र बंद पडण्याची शक्यता आहे.

युक्रेनच्या अणू ऑपरेटर एनगएटमने अणुऊर्जा केंद्रावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने युक्रेनमधील अणुऊर्जा संयंत्राच्या स्थितीवर करडी नजर असल्याचे म्हटले आहे. तसेच सद्य स्थितीत अणुसुरक्षेचा कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे युक्रेनकडे नायपर नदीवर बनलेल्या सहापैकी पाच धरणांचे नियंत्रण आहे. ही नदी बेलारूससोबत युक्रेनच्या उत्तर सीमेसोबत काळ्या समुद्रापर्यंत वाहते. युक्रेनमधील पाणीपुरवठा आणि जलविद्युत निर्मितीसाठी ही नदी अतिशय महत्त्वाची आहे. पण १६ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाने काखीका धरणाचे नियंत्रण आपल्या हातात घेतलेले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts