ताज्या बातम्या

टीईटी घोटाळा, अब्दुल सत्तारांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द

शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळा प्रकरणाचे धागेदोरे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या मुली हिना आणि उजमा यांची नावे असल्याचे समोर आले असून त्यांची प्रमाणपत्रेही रद्द करण्यात आली आहेत.

हिना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या मुली असून २०२० मध्ये त्या अपात्र ठरल्या आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोन्ही मुलींचा समावेश आहे.

उजमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. पुणे सायबर सेल पोलिसांनी टीईटी परीक्षेचा गैरव्यवहार उघडकीस आणला होता.

या प्रकरणात तपास करत असताना २०१९-२० च्या टीईटी परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थ्यांना पात्र केल्याचे दिसून आले. परीक्षा परिषदेकडून जी यादी जाहीर करण्यात आली आहे,

त्यामधील सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये सात शैक्षणिक संस्था असून या संस्थांमध्येच या मुलीही सेवारत असल्याचे सांगण्यात आले. हे प्रकरण वाढल्यास अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदाची संधीही हुकण्याची शक्यता आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts