ठाकरे सरकारची तालिबानी मानसिकता !

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- वारंवार विनवण्याकरुनसुध्दा मंदिरं उघडली जात नाहीत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो गरीबांचं दुःख या सरकारला समजत नाही, आमचे देव दीर्घकाळापर्यंत कडी-कुलपात बंदिस्त करुन ठेवले आहेत, ही या ठाकरे सरकारची तालिबानी मानसिकता आहे.

सोमवारपर्यंत मंदिरं उघडा नाही तर, राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी दिला आहे. मागील काही दिवसापासून मंदिर बंद ठेवण्यात आली आहेत. तुम्ही एकीकडे, दारूची दुकाने, बियर बार, मदिरालय उघडता.

मात्र आमच्या हिंदूचे श्रद्धास्थान असलेले मंदिर का उडत नाही? असा सवाल सुद्धा आमच्या ठाकरे सरकारला आहे. त्यामुळे लवकरात लवकर मंदिरे उघडावेत अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करू असं भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याआधी विरोधी पक्षनेते यांनी देवेंद्र फडणवीस यांनी देखील मंदिरे उघडण्याची मागणी करत ठाकरे सरकारवर निषाणा साधला होता. यावेळी फडणवीस यांनी कोरोना नियमांचे पालन करत सोशल डिस्टन्सचे पालन करत मंदिरे सर्वांसाठी उघडण्यास काय हरकत आहे? असा सवाल केला होता.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts