ताज्या बातम्या

“तुम्ही तेच तेच काय विचारता”, INS विक्रांतसाठी पैसा जमा केला होता तर तो कुठे गेला? पत्रकारांच्या प्रश्नावर सोमय्या भडकले

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांतसाठी (INS Vikrant) जमा केलेल्या पैशात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवर चांगलेच भडकल्याचे दिसले आहे.

किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी विक्रांतसाठी जमा केलेला पैसा गेला कुठे असा प्रश्न विचारला होता. यानंतर सोमय्या गरबडले आणि सोमय्यांनी दादा… दादा… म्हणंत मूळ विषय बाजूला करत वेगळेच उत्तर दिले आहे.

यावेळी सोमय्यांना पान्हा एकदा तोच प्रश्न विचारण्यात आला आता ते म्हणाले, मी पैसा किती जमा केला आणि तो कुठे गेला याचं उत्तर शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनीच दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीच त्याचं उत्तर दिलं आहे. तुम्ही तेच तेच काय विचारता?

किरीट सोमय्या यांनी त्या पैशाचे काय केले हे उत्तर दिलेच नाही त्यामुळे कुठेतरी शंका उपस्थित केली जात आहे. सोमय्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याप्रकरणी ईडी (ED) कार्यालयात आले होते.

यावेळी त्यांच्यासोबत साखर कारखान्याचे काही निवडक सदस्यही होते. यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले की, मला विचारलंच नाही, डायरेक्ट एफआयआर दाखल केली.

पोलिसांनी अटक करण्यासाठी हे सेक्शन लावलं, तर पोलिसांनी सांगावं 58 कोटी कुठून आले? मी नाही सांगणार. राऊतांनीच हा आकडा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यावर सांगितलं आहे असेही सोमय्या म्हणाले आहेत.

आता मला गुन्हेगार केलं आहे. त्यांच्याकडे माहिती असल्याशिवाय कसं करणार. आता उद्धव ठाकरेंनी सांगावं, तू खूप बोलतोय म्हणून मी तुझ्यावर गुन्हा दाखल केला आहे, असं आव्हानच सोमय्या यांनी दिलं.

विक्रांतला आता 10 वर्ष झाले. राऊतांनी आरोप केला म्हणून प्रश्न उपस्थित झाला. आता चर्चा त्यांच्या आरोपाची आहे. आरोप का आला? कारण त्यांची प्रॉपर्टी जप्त केली.

संजय राऊतांनी ही कंप्लेंट केली. संजय राऊत हे शिवसेना पार्लामेंट्री कमिटीचे सदस्य आहे, संजय राऊतांनी डॉक्युमेंट द्यावे, नंतर बोलावं असेही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, एफआयआरची कॉपी मिळाली. इन्चार्ज मला टोप्या लावत होते, एवढं हास्यास्पद काम उद्धव ठाकरेच करु शकतात. एका नागरिकांनी तक्रार केली की, यात 58 कोटीचा व्यवहार झाला, असं मी वर्तमानपत्रात वाचलं.

संजय राऊत बोलतात, तर बोलून गेले. नील सोमय्याच्या खात्यात पैसे खात्यात जमा झाले. अमित शहांना पैसे दिले असंही म्हणाले, त्याचं पुढं काय झालं.

एक दीड महिना झाला एसआयटी लावली, काय झालं पुढे? राऊत म्हणाले 426 कोटी वाधवानने दिले, काय झालं पुढे? माझी काही हरकत नाही, माझी चौकशी करा असेही किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts