महसुल विभागाच्या आक्रमक कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात वाळूतस्करांनी धुडगूस घातला आहे. वाढत्या वाळू तस्करीमुळे प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान या वाळू तस्करांविरुद्ध महसूल विभागाने आक्रमक कारवाईस सुरुवात केली आहे. नुकतेच नेवासा तालुक्यातील पाचेगाव, पुनतगावात अनधिकृत वाळू तस्करी करणाऱ्यांवर माहुल विभागाने थेट कारवाई केली आहे.

महसूलच्या या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा तालुक्यातील पुनतगाव शिवारातील प्रवरा नदीपात्रात पाणी असल्याने वाळू तस्करांकडून बोटीने वाळू उचलली जाते.

नदीपात्रात पाणी असल्याने वाळू उचलण्यासाठी जागा नसल्यामुळे बोटीचा (थर्माकॉल तराफा)चा वापर केला जातो. पाण्यातून ही वाळू उपसून नदी काठावर साठविण्यात येत होती. त्यानंतर ती वाहनात भरून विकली जात होती.

या घटनेची खबर लागताच महसूल विभाग आणि पुनतगाव ग्रामस्थ यांनी संयुक्त कारवाई करत एक बोट पेटवून दिली. दरम्यान महसूल विभागाच्या या कारवाईने वाळू चोरांचे धाबे दणाणले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts