ताज्या बातम्या

शरद पवारांच्या घरापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन म्हणजे संशयास्पद; धनंजय मुंडे

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला कुठेतरी ब्रेक लागला असताना आज पुन्हा या आंदोलनाने उसळी घेतली आहे, मात्र हे आंदोलन आता थेट राष्ट्रवादी (Ncp) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरापर्यंत पोहोचले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांकडून (ST staff) शरद पवार यांच्या घरावर चप्पल आणि दगडफेकी करण्यात आली, यावरून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, “न्यायालयानं यासंदर्भात निर्णय दिला. त्याचं स्वागत केलं, पेढे वाढले आणि काही जण हे आंदोलन पेटत राहावं यासाठी प्रयत्न करत होते. आजपर्यंत शरद पवार हे कर्मचाऱ्यांच्या बाजूनं लढाईत उतरलेत.

आजपर्यंत कोणतंही आंदोलन सत्ताधारी पक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या नेत्याच्या घरापर्यंत गेलं नाही. या सरकारनं जेवढे एसटी कर्मचाऱ्या बाजूनं निर्णय घेतले तितके कोणी घेतले नाहीत.

यानंतरही आंदोलकांनी घरापर्यंत जावं, दगड फेकून, चपला फेकून मार्ग निघणार नाही. उद्या कोणीही कोणाच्या घरावर जाईल आणि आमच्या मागण्या मान्य करा, दगड फेकू चपला फेकू असं होईल, हे दुर्देवी आहे,” असे ते यावेळी म्हणाले आहेत.

तसेच “शरद पवारांनी अनेक वर्ष कर्मचाऱ्यांच्या बाजूनं हयात घातली. त्यांच्याच घरावर हे आंदोलन झालं. यात कुठेतरी संशयही निर्माण होतोय हे समोर येणं गरजेचं आहे. हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आहे असं वाटलं” असंही ते म्हणाले. त्यामुळे हे षडयंत्र पोलिसांनी (Police) तपासलं पाहिजे असे धनंजय मुंडे बोलले आहेत.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts