Maharashtra : मुंब्रा येथील वाय ब्रिजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. मुख्यमंत्री जाण्याच्या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी एका महिलेला बाजूला करण्यासाठी तिच्या खांद्याला हात लावला आणि तिला बाजूला केले.
मात्र याचे आज वेगेळेच पडसाद उमटताना दिसत आहेत. या महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात कलम 354 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर 72 तासांत 2 गुन्हे दाखल करण्यात आल्यामुळे चांगलेच नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी ट्विट करत आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे असे म्हंटले आहे.
तसेच त्यांच्या पंतांनी ऋता आव्हाड यांनीही माध्यमांशी बोलताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या हा पोकरटपणा आहे, विनयभंग होतो तर गर्दीत जाताच कशाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
ज्या महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे त्या महिलेने माध्यमांना प्रतिक्रिऱ्या दिली आहे. ती म्हणाली, मी अनेक कार्यक्रमांना उपस्थित असते. त्या दिवशीही उपस्थित होते. साहेबांचा निघण्याचा वेळ होता. मलाही भेटायचं होते…
मी भेटायला पुढे गेले. तर आमदारांना अडचण आली माझी. मी समोर होते. त्यांना जायला वाट नव्हती. त्यांनी मला गच्च धरून बाजूला करून फेकून दिले. मला ढकलले. आज हे माझ्याबरोबर झालंय. हे कुणाबरोबरही होऊ शकते.
आमदार साहेबांचं वागणं खूप चुकीचं होतं. माझ्या परवानगीशिवाय मला हात लावलाय, त्याची मी खूप निंदा करते. मी आपले पोलीस आणि गृहमंत्र्यांना विनंती करते.
जे माझ्याबरोबर झालंय, त्यानुसारच कलम लावा. ३५४ कलम लावून मला न्याय देण्याची मागणी तुमच्याकडे करतेय, अशी प्रतिक्रिया भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने दिली आहे.