अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2022 maharashtra news :- गेल्या 13 दिवसात इंधनात दरवाढ झाल्यामुळे त्याचा सर्वाधिक परिणाम शेतीमालाच्या वाहतुकीवर झाला आहे. परिणामी भाजीपाल्याच्या किंमती देखील वाढले आहेत.
22 मार्च पासून पेट्रोल-डिझेल,सीएनजीच्या दरात वाढ झाली असल्यामुळे शेतीमाल वाहतुकीचे दर ही वाढले आहेत. त्यामुळे भाजीपाल्यांच्या खरेदी किंमती देखील वाढ झाली आहे.
याचा सर्वाधिक फायदा हा शेतकऱ्याला न होता विक्रेत्याला होत आहे. तर लिबांच्या बागांचे यावर्षी वातावरणातील बदलामुळे नुकसान झाल्यामुळे उत्पादन घटले आहे. परिणामी घटलेल्या उत्पादनामुळे लिंबाच्या दरात वाढ झाली आहे.
त्यात वाढत्या उन्हामुळे लिंबाची मागणी वाढली आहे. पण घटलेल्या उत्पादनामुळे आणि आता इंधन दरवाढीमुळे बाजारपेठेत लिंबाची किंमत ही 150 ते 200 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.
वाढलेल्या इंधन दरामुळे देशाच्या राजधानी लिंबाचे दर हे 300 ते 350 रूपये किलो असे आहेत. म्हणजे एक लिंबू घेण्यासाठी लोकांना 10 रुपये द्यावे लागत आहेत.
यापेक्षा अधिक दराने जोधपूर, वस्त्रापुर, गुजरात येथे विक्री होत आहे. येथे एक लिंबाची किंमती चक्क 18 ते 20 रुपयांपर्यंत पोचली आहे.
त्यात वाढत्या उन्हामुळे मिरचीचे उत्पादन कमी मिळत असल्यामुळे तिचेही दर वाढले आहेत. त्या मानाने महाराष्ट्रात भाजीपाल्याचे दर हे नियंत्रित आहेत. कारण बाजारपेठेच्या अंतरावरूनही भाजीपाल्याची दर ठरत असतात.