भरधाव बुलेटने समोरून येणाऱ्या दुचाकीला दिली धडक; या ठिकाणी घडला अपघात

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :-  उक्कलगावकडून कोल्हारच्या दिशेने चाललेल्या भरधाव बुलेटने समोरून कोल्हारकडून येणार्‍या दुसऱ्या एका दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघात झाला.

दरम्यान या अपघातात एक जण गंभीर जखमी होऊन दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अधिक माहिती अशी, एकलहरे (आठवाडी) येथील धर्मेंद्र शिंदे यांचा मुलगा व सून संगमनेरकडे बहिणीला भेटण्यासाठी चालले होते.

दरम्यान समोरून कोल्हारच्या दिशेने विजय बाबुराव उपाध्ये (रा.सात्रळ-सोनगाव) हे आपली पत्नी व दोन मुलांसह बेलापूर येथे लग्न समारंभासाठी येत होते.

दरम्यान दोन्ही दुचाकी परस्परविरोधी दिशेने उक्कलगावातील फर्‍याबागनजीक आल्या असता त्यांची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले तर विजय बाबुराव उपाध्ये किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी उक्कलगावच्या नागरिकांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts