अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात प्रशासनाने पुन्हा एकदा काही निर्बंध लागू करण्यात आले आहे.
शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधाप्रमाणे दुपारी 4 वाजता बाजारपेठ बंद करण्याचे आदेश दिले आहे. मात्र सुप्यात दुकानाचे शटर बंद करून आतून विक्री सुरु ठेवण्याचे प्रकार सुरु झाले आहे.
करोना रुग्णांची वेगाने वाढलेली संख्या कमी झाल्यानंतर नगर जिल्हा 15 दिवसांपूर्वी अनलॉकझाला. मात्र, संभाव्य तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा निर्बंध जारी केले. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नवीन नियमांचे आदेश लागू केले
. यात रुग्णालये व औषध दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत चालू ठेवण्याचे आदेश दिले. या आदेशाचे पालन करण्यासाठी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या सुचनेनुसार सोमवारी दुपारी चारनंतर सुपा बाजारपेठ बंद ठेवण्यात आली.
यावेळी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी बाजारपेठ, भाजीपाला बाजार, सुपा- पारनेर रोड, बसस्थानक चौक व नगर-पुणे महामार्गावरील दुकाने, हॉटेल, फळ विक्रेते यांना दुकाने बंद करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी काही दुकानदार लगेच दुकाने बंद करत होते, तर काही दुकानदार शटरच्या आत ग्राहकांना माल देत होते. काही दुकानदार पथक पुढे गेल्यावर मागे ग्राहक करताना दिसत होते. यामुळे अजूनही नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य आलेले दिसत नाही आहे.