रिझर्व्ह बँकेने कारवाई केलेल्या अभ्युदय बँकेचा अहदनगरसह देशभर पसरला आहे व्यवसाय ! कशी झाली होती सुरवात ? कारवाईनंतर गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम? जाणून घ्या

Ahmednagar News : अहमदनगरसह महाराष्ट्रभर सहकार क्षेत्रातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या अभ्युदय सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने मोठी कारवाई केली आहे. या बँकेचे संचालक मंडळ एका वर्षासाठी बरखास्त करून या ठिकाणी प्रशासक नेमला आहे.

या कारवाईनंतर गुंतवणूकदारांतही खळबळ उडाली आहे. अभ्युदय बँकेवर कारवाई का झाली? कोणते निर्बंध लादले आहेत? आर्थिक व्यवहार आता होतील का? गुंतवणूकदारांच्या पैशांवर काय होईल परिणाम?

आदी प्रश्नांची उत्तरे गुंतवणूकदारांना हवी आहेत. आपण याठिकाणी हे सर्व विस्ताराने जाणून घेऊयात –

* बँकेवर कारवाई का झाली?

अभ्यूदय बँकेवर प्रशासक नेमण्यात आला असून स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक हे सध्या प्रशासक म्हणून काम पाहतील. संचालक मंडळ एक वर्षासाठी बरखास्त असेल. बँकेच्या प्रशासन कार्यपद्धतीतून काही गंभीर बाबी समोर आल्यात आणि त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलंय की, प्रशासन मानकांबाबत हयगयीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे निरीक्षण करता ही कारवाई करणे आवश्यक होते. महत्वाचे म्हणजे अभ्युदय सहकारी बँकेचे कर्जवाटप तसेच लाभांश वाटपासंदर्भात मागील दोन वर्षांपासून रिझर्व्ह बँकेने मर्यादा यावर घातलेल्या होत्याच आता यापुढे जाऊन आता वर्षभरासाठी प्रशासक नेमला आहे. तोच आता कामकाज सांभाळणार आहे.

* आर्थिक व्यवहार होतील का?

बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर कसलाही परिणाम होणार नाही असं सांगितलं गेलं आहे. बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर कोणतेही निर्बंध लादले नसल्याचे रिझर्व्ह बँकेनेच स्पष्ट केले असल्याने चिंता नाही. त्यामुळे आता बँक आपले दैनंदिन व्यवहार नेहमीसारखे करू शकेल असे सांगितले आहे.

* गुंतवणूकदारांच्या पैशांवर काय होईल परिणाम?

बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर कसलाही परिणाम होणार नसल्याचे आरबीआयने सांगितले असल्याने गुंतवणूकदारांच्या पैशांवर काही परिणाम होणार नाही.

* प्रशासकास कोण मदत करेल

स्टेट बँकेचे माजी महाव्यवस्थापक सत्यप्रकाश पाठक हे प्रशासक असतील, व त्यांना कामकाजात रिझर्व बँकेने नेमलेली सल्लागार मंडळ मदत करेल. यात स्टेट बँकेचे माजी सरव्यवस्थापक व्यंकटेश हेगडे, सनदी लेखापाल महिंद्र छाजेड आणि कॉसमॉस सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले यांचा समावेश असून ते यांना मदत करतील.

* कशी झाली होती बँकेची सुरवात? सध्या कोठे आहेत व्यवसाय

अवघ्या पाच हजारांत अभ्युदय सहकारी बँक १९६४ मध्ये सुरू करण्यात आली होती. दुधाचे व्यापारी आणि लघुउद्योजकांसाठी या बँकेचे नियोजन करण्यात आले होते. जून १९६५ मध्ये अभ्युदय को-ऑप. बँक सुरू झाली व त्यानंतर १९८८ मध्ये बँकेला आरबीआयने शेड्यूल बँकेच्या श्रेणीत घेतले होते. सध्या बँक मुंबईसह , महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकातही सध्या आपला व्यवसाय करत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts