ताज्या बातम्या

कारने दिंडीला चिरडलं, तिघा भाविकांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :-  पायी चालत जाणाऱ्या ३ भाविकांना सांगलीत खासगी चारचाकी वाहनाने चिरडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

टायर फुटल्याने समोरुन येणाऱ्या मोटार सायकलला धडकून कारने दिंडीला चिरडले. या अपघातात तिघा जणांना प्राण गमवावे लागले, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील प्रसिद्ध असणाऱ्या महालिंगराया यात्रेसाठी कर्नाटकचे भाविक पायी निघाले होते.

या अपघातात बसवराज दुर्गाप्पा चिंचवडे (रा. मदभावी तालुका लिंगसूर जिल्हा रायचुर), नागप्‍पा सोमांना आचनाळ (रा. देवभूसर तालुका लिंगसूर जिल्हा रायचूर) आणि म्हणप्पा दुर्गप्पा गोंदीकल अशी मृत्यू झालेल्या तिघा भाविकांची नावे आहेत.

पंढरपूर ते विजयपूर मार्गावरील उमदी पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर शेवाळे वस्ती जवळ त्यांना अपघात झाला.

पुण्याहून पोलो या चार चाकी गाडीचा (वाहन क्रमांक एम एच 12-8598) टायर फुटून भीषण अपघात झाला. यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts