अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- राहाता शहरातील साई व्ही. के. टायर्स या दुकानावर चोरटयांनी लाखोंच्या मालावर आपला हात साफ केला आहे. रात्रीच्या सुमारास चोरटयांनी दुकानात शोरूम अपोलो कंपनीचे सुमारे 4 लाख 90 हजार रुपयांचे टायर चोरून नेल्याचे उघड झाले आहे.
आतापर्यंत शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत त्याचा तपास अजूनपर्यंत लागलेला नाही. त्यातच नगर -मनमाड रोडलगत असलेल्या टायरच्या दुकानात चोरी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता नुकत्याच घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांना चोरट्यांनी आव्हान दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सदर टायरचे दुकान हे पार्टनरशिपमध्ये असून दिनांक 25 रोजी मॅनेजर सचिन जगताप हे दुकान बंद करून गेले.
नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी मॅनेजर जगताप आले दुकान उघडून आत गेले तर त्यांना दुकानाचे मागील बाजूचे पत्र्याचे शेड उचकटल्याचे लक्षात आले. त्यानंतर दुकान मालक गणेश खेडके व शंकर विखे यांना सादर चोरीची कल्पना यांनी दिली.
दुकानातील अपोलो कंपनीचे टायर्स एकूण 4 लाख 90 हजार 667 रुपये किमतीचे चोरीस गेले आहेत. अशोक खेडके व शंकर विखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून
सदर घटनेचा तपास राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शना खाली ए. पी. आय. संतोष पगारे करत आहेत.