अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- एमआयएम पक्षाचे खासदार आणि राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गुरुवारी गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती.
हा उत्तर प्रदेशातून दिल्ली येथे जाताना हा हल्ला त्यांच्या गाडीवर झाला होता. या प्रकरणाची केंद्रानं दखल घेतली आहे. एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला असून त्यामध्ये बदल करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे आणि त्यांना तात्काळ CRPF च्या Z श्रेणी सुरक्षा प्रदान केली आहे.
अशी माहिती समजते आहे. तर हल्ल्यानंतर ओवेसी यांनी सुरक्षा घेण्यास नकार दिला असून, माझी सुरक्षा सरकराची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. “१९९४ मध्ये मी माझ्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत मी कोणतीही सुरक्षा घेतली नाही. मला हे आवडतही नाही.
माझी सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे. मी भविष्यातही सुरक्षा घेणार नाही. जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जाईन. असं ओवेसी म्हणाले होते. नेमके प्रकरण काय ?
एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या गाडीवर उत्तर प्रदेशातील मेरठजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यांनी स्वतः ट्विट करत आपल्या गाडीवर चार राउंड फायर झाल्याचा दावा केला होता. या हल्ल्यात त्यांना कोणतीही हानी झाली नसून ते सुखरूप आहेत.
मात्र या हल्ल्यानंतर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. AIMIM च्या खासदारांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली होती. आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून ओवेसींचा पाठलाग करत होते, पण त्यांना हल्ल्याची संधी मिळत नव्हती.
जेव्हा ओवेसी मेरठमधून दिल्लीला परतत होते तेव्हा त्यांची गाडी टोलनाक्यावर थांबली होती. हीच संधी लक्षात घेता आरोपींनी वाहनावर गोळीबार केला.
या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून सचिन आणि शुभम असे अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचे नाव आहे.