स्थायी समितीच्या सभापतीने गुरुवारी बोलवली सभा

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-महापालिका स्थायी समितीची सभापती अविनाश घुले यांनी गुरूवारी (दि. 8) दुपारी एक वाजेच्या सुमारास स्थायी समिती सभागृहात सभा बोलावली आहे.

सभापती पदी निवड झाल्यानंतर अविनाश घुले यांची पहिलीच अर्थसंकल्पीय सभा झाली. त्यानंतर आता ही दुसरी पण खर्‍या अर्थाने पहिली सभा होत आहे.

घुले यांनी ही सभा ऑनलाईन न घेता ऑफलाईन बोलाविली आहे. सभेत मात्र कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन सभापती घुले यांनी केले आहे.

जिल्हा न्यायालयाच्या इमारतीला दिलेल्या पाणीपट्टीतील शास्तीमाफी, जिजामाता आणि नेहरू उद्यान बीओटी तत्वावर देणे तसेच बुरूडगाव कचरा डेपोसदंर्भातील निविदा आणि पाणीपट्टी निर्लेखित करणे असे 22 विषय सभेसमोर ठेवण्यात आले आहेत.

नागरी दलित वस्ती सुधारण योजनेंतर्गत गटार आणि रस्ते डांबरीकरणाचे विषयही समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. सुमारे चार कोटी रूपयांच्या निविदांचे विषय समितीच्या सभेत चर्चेला येणार आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts