अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :- कर्जत तालुक्यातील जनतेने माझ्या दहा वर्षाच्या कुकडीचे पाणी किती आणि कसे मिळते हे पाहिले आहे. ते पाणी देणे हे सोपे काम नाही.
त्यासाठी माझ्यासारख्या खमक्या आमदार लागतो, दुर्दैवाने मागील दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना कुकडीचे पाणी मिळाले नाही, त्याला केवळ आमदार रोहित पवार हे जबाबदार आहेत अशी टीका भाजपचे जिल्ह्याचे जेष्ठ नेते माजी मंत्री राम शिंदे यांनी केली.
माजी मंत्री राम शिंदे येथील पत्रकार परिषदेत म्हणाले, कुकडीचे पाणी न मिळण्यास राज्यातील सरकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार जबाबदार आहेत. पाणी द्यावयाचे नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केली असा आरोप राम शिंदे यांनी केला.
राम शिंदे पुढे म्हणाले की , लसीकरण केंद्र उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात न घेता शहरातील कोणत्याही विद्यालयात घेतल्यास लसीकरणसाठी येणाऱ्या नागरिकांचा आणि करोनाबाधित व्यक्तीचा संपर्क येणार नाही अशी मागणी माजीमंत्री राम शिंदे यांनी विभागीय आयुक्त भानुदास पालवे यांच्याकडे केली.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, माजी तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, किसान मोर्चाचे सुनील यादव, शहराध्यक्ष वैभव शहा उपस्थित होते.