अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाचा खूप गंभीर परिणाम ऑटो सेक्टरवर झाला. परंतु आता यातून बाहेर येण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्या विविध ऑफर देत आहेत.
पहिल्या लाटेमधून सावरल्यानंतर पुन्हा दुसऱ्या लाटेमधे या क्षेत्रापुढे आव्हाने निर्माण झाली. परंतु या काळातही एक कंपनी आहे ज्याचे इलेक्ट्रिक स्कूटर वेगवान विक्री होत आहे.
बजाज चेतक असे या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. बजाज इलेक्ट्रिकने एप्रिल 2021 मध्ये एकूण 510 युनिटची विक्री केली. आकडेवारी पाहिल्यास बजाज चेतक इलेक्ट्रिकने उत्तम कामगिरी केली आहे.
मार्चमध्ये त्याची 90 युनिट विक्री झाली. बजाज स्कूटरला ग्राहकांकडून जोरदार रिव्यू मिळत आहेत. गेल्या महिन्यात, कंपनीने या स्कूटरची ऑनलाइन विक्री सुरू केली होती तेव्हा अवघ्या 48 तासात स्कूटर चा सेल झाला होता.
सिंगल चार्जवर जाईल 95 किमी;- यामध्ये आपल्याला ड्रायव्हिंगचे वेगवेगळे मोड मिळतात ज्यात स्पोर्ट आणि इको आहे. कंपनीचा असा दावा आहे की, इको मोडवर ते 95 कि.मी. रेंज देतात, तर स्पोर्ट मोडमध्ये ती. 85 किमी रेंज देते. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. क्विक चार्जच्या मदतीने, केवळ 1 तासात 25 टक्के चार्ज केले जाऊ शकते.
फीचर्स:– यात तुम्हाला एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी टर्न इंडिकेटर मिळतात. हे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टच सेन्सिटिव्ह स्विच, की लेस स्टार्ट स्टॉप आणि डिझायनर अॅलोय व्हील्ससह येते. यामध्ये आपल्याला डिजिटल कन्सोल देखील मिळेल. इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1,00,000 रुपये आहे. त्याच वेळी, आपण वेरिएंट बदलल्यास ते 1 लाख 15 हजारांपर्यंत जाऊ शकते.