कोरोना रुग्णाला दारु दिल्यास तो बरा होतो म्हणणाऱ्या त्या अहमदनगरच्या डॉक्टरची माघार, म्हणाले ‘तुम्हीच …

अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. देशात दररोज तीन लांखांहून अधिक कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गावर अद्याप औषध तयार झालेलं नाही.

कोरोना प्रतिबंधक लसींद्वारे लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. कोरोनावरील उपचारांसाठी एकीकडे रेमडेसिव्हीर आणि इतर औषधांची कमतरता जाणवतं आहे.

या परिस्थितीत कोरोना रूग्णांना बरे करण्यासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगावचे डॉ. अरुण भिसे यांनी अजब फंडा वापरला आहे. कोरोना रुग्णाला योग्य प्रमाणात दारु दिल्यास तो बरा होता, असा दावा डॉ. अरुण भिसे यांनी केला होता.त्यानंतर उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.

मात्र आता असा दावा करणाऱ्या ह्या डॉक्टर भिसे यांनी माघार घेतली आहे,फक्त देशी दारूने करोना बरा होता, असा आपला दावा नाही. आपण केवळ आपला अनुभव सांगितला आहे.

यात कोणाचीही दिशाभूल करण्याचा आपला उद्देश नाही. तथापि आपण आपली यासंबंधीची पोस्ट मागे घेत असून टास्क फोर्सने मान्यता देईपर्यंत कोणीही देशी दारूचा प्रयोग करू नये,’ असे म्हंटले आहे.

प्रशासनाकडून आलेल्या चौकशीच्या नोटिसीला त्यांनी उत्तर दिले असून संबंधित पोस्टही मागे घेतली आहे. ‘यानंतरही कोणी असा उपचार केला, तर होणाऱ्या परिणामांना तुम्हीच जबाबदार राहाल,’ असा इशाराही त्यांनी नागरिकांना दिला आहे.

तीन दिवसांपूर्वी डॉ. भिसे यांनी एक पोस्ट लिहून करोना रुग्णाला काही दिवस दररोज ६० मिलीलीटर देशी दारू पाजल्यास करोना लवकर बरा होता असा दावा केला होता.

आपण हा प्रयोग ५० रुग्णांवर केल्याचेही त्यांनी नमूद केले होते. त्यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. आरोग्य विभाग आणि प्रशासनानेही याची दखल घेऊन डॉ. भिसे यांना नोटीस पाठविली. या नोटिशीला डॉ. भिसे यांनी उत्तर दिले आहे.

डॉ. भिसे यांनी म्हटले आहे की, ‘देशी दारूमुळे करोना बरा होतो, असा दावा आपण केलेला नाही. नेहमीची ॲलोपॅथिक औषधे आणि प्रमाणित मात्रेत अल्कोहोल सेवन केल्यास करोना रुग्ण बरा होतो, असा अनुभव सांगितला आहे.

भिसे यांनी सोशल मीडियातील आपली मूळ पोस्ट काढून टाकली असून आणखी एक नवी पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘आपण सर्वांना सांगू इच्छीतो की मी फक्त देशी दारूने करोना बरा होतो, असा दावा केलेला नाही.

ज्या रुग्णांवर मी हा प्रयोग केला, त्यांच्यावर सरकारने प्रमाणित करून दिलेले उपचारही सुरू ठेवले होते. करोनावर उपचार म्हणून अल्कोहोलचा वापर करण्यास तज्ज्ञांनी अद्याप मान्यता दिलेली नाही.

त्यामुळे कोणीही आपल्या रुग्णाला माझ्या त्या पोस्टप्रमाणे अल्कोहोल देऊ नये. त्यासाठी कोविड टास्क फोर्सची परवानगी आवश्यक आहे. ती मिळविण्यासाठी मी प्रयत्न करीन.

माझ्या त्या पोस्टचा गैरअर्थ काढून कोणी अपप्रचार करून व्यसनाचे किंवा दारूचे समर्थन करू नये. डॉक्टरांचा सल्ला न घेता चुकीचा उपचार स्वत:च्या मनाने केला तर होणाऱ्या परिणामाला तुम्ही स्वत: जबाबदार असाल, याची नोंद घ्यावी,’ असेही डॉ. भिसे यांनी म्हटले आहे.

दरम्यान डॉ. अरुण भिसे यांनी आतापर्यंत 40 ते 50 जणांना दारु घेण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी तो मान्य केल्याची माहिती भिसे यांनी दिली. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणि दारुचं औषधी प्रमाण घेण्यास सांगतिलं.

त्याप्रमाणं 40 ते 50 पेशंट बरे झाले आहेत. त्यापैकी 10 रुग्ण गंभीर होते, ते बरे झाले, आतापर्यंत एकाचाही मृत्यू झाला नाही, असं अरुण भिसे यांनी सांगितलं आहे. डॉ. अरुण भिसे यांच्या दाव्याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts