चालु हंगामामध्ये भंडारदरा धरण लाभक्षेत्रामध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा काही झाले तरी जायकवाडीला पाणी जावू देणार नाही, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, तरी चालेल, परंतु जायकवाडीला पाणी जावू देणार नाही, असा निर्धार येथील सर्वपक्षीय पाणी परिषदेमध्ये काल बुधवारी करण्यात आला.
या हंगामामध्ये भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये ५० टक्क्यापेक्षा कमी ‘पाऊस झाल्याने भंडारदरा लाभक्षेत्रातील गावांमध्ये जानेवारी पासून भिषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे श्रीरामपूर, राहुरी, राहाता, नेवासा तालुक्यातील सर्वपक्षीय पाणी परिषदेचे श्रीरामपूर बाजार समितीच्या शेतकरी मंगल कार्यालयात बुधवारी आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध मान्यवर बोलत होते. याप्रसंगी पाणी परिषदेला तिन्ही तालुक्याचे लोकप्रतिनिधी गैरहजर होते. तर माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, परिषदेचे निमंत्रक जितेंद्र भोसले,
तिलक डुंगरबाल, शिवसेनेचे सचिन बडदे, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, डॉ. वंदना मुरकुटे, आण्णासाहेब थोरात, अशोक थोरे, नागेश सावंत, अशोक बागुल, रविंद्र मोरे, सुभाष त्रिभुवन, कैलास बोर्डे, अभिजीत लिप्टे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी आण्णासाहेब थोरात, कैलास बोर्डे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, मिलींदकुमार साळवे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, सभापती सुधीर नवले, सचिन बडदे, तिलक डुंगरवाल, अभिजीत लिप्टे, नागेश सावंत, अशोक बागुल, अशोक थोरे,
माजी नगरसेवक अशोक कानडे, गोविंदराव वाबळे, सुभाष त्रिभुवन आदींनी मनोगत व्यक्त करुन सुरेश ताके यांनी मांडलेल्या ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.