अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :-राज्यातील विविध भागांत आयोजित करण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीबाबत कायद्याच्या चौकटीत बसूनच निर्णय घ्यावा लागेल, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
सांगलीच्या झरे गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील राजकीय युद्ध सुरू आहे.
या संदर्भात जयंत पाटील यांना छेडले असता ते म्हणाले की, बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्बंध आहेत. त्यामुळे अशा शर्यती होत असतील तर त्यावर कायद्याच्या चौकटीत बसून राज्य शासनाला निर्णय घ्यावा लागतो.
काही राजकीय पक्षाचे नेते सर्वसामान्यांची दिशाभूल करून आपल्याकडे लक्ष वेधण्याचे काम करत असतात. अशा प्रवृत्तीकडे यापुढे समाजच दुर्लक्ष करेल, अशी खात्री आपल्याला आहे. असे सांगत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जयंत पाटील यांनी टीका केली.