अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :- बारामतीमधल्या देसाई इस्टेट इथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमामध्ये एका प्रसंगावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पारा चढला.
‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, अशा शब्दात त्यांनी काम घेऊन आलेल्या व्यक्तीला सुनावलं. एक व्यक्ती आपलं काम घेऊन अजित पवार यांच्याकडे आला. यावेळी आपल्या कामाचं निवेदन त्याने अजितदादांना दिलं.
माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो ती यामध्ये लक्ष घालून मला सहकार्य करावं, अशी विनंती संबंधित व्यक्तीने अजितदादांकडे केली. निवेदन पाहून अजित पवार चांगलेच भडकले.
उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय, अशा शब्दात अजित पवारांनी संबंधित व्यक्तीला सुनावलं.
दरम्यान, बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल, सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल. तसेच चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका. उपमुख्यंत्री काय वसुली करायला बसला नाही, असं अजित पवार म्हणाले.