अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- तारकपूर रस्ता ते रामवाडी पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता हा नवीन डीपी रस्ता म्हणून मनपाने घोषित केला आहे. या रस्त्याचे काम करत असताना रस्त्यावर रामवाडी येथील काहींनी अनाधिकृतपणे दुकाने थाटली आहे.
ही अनाधिकृत दुकानाचे अतिक्रमण काढण्यास महापालिका प्रशासनाच्या वतीने मोठ्या पोलीस बंदोबस्त मध्ये सुरुवात करण्यात आली होती.
दरम्यान जिल्ह्यासह शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे व कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे दुकाने बंद ठेवणायत आली आहे.
दरम्यान दुकाने बंद जरी असली तरी दुकानांमध्ये माल तसाच आहे. यामुळे दुकानातील आतमध्ये पडून असलेलं सामान काढण्यास आम्हाला मुभा द्यावी व त्यानंतर आपण आपली कारवाई करावी, अशी विनंती दुकानदारांनी केली व त्यानंतर कारवाई थांबविण्यात आली.
अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी एक दिवसांची मुदत दुकानदराना देण्यात आली असल्याचे सांगितले.
जर एक दिवसाच्या आता दुकानदारांनी दुकाने खाली केली नाही, तर मनपा अतिक्रमण विभाग ही दुकाने जमीनदोस्त करणार असा इशाराही इथापे यांनी दिला आहे.