कुटुंबीय मदतीसाठी धावले पण त्याचा जीव वाचवू नाही शकले

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :-  पहाटे शौचासाठी घराबाहेर जात असताना घराबाहेर पडलेल्या विजेच्या तारेवर तरुणाचा पाय पडल्याने एकाच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

दरम्यान हि घटना घडताना पाहताच वडील व भाऊ त्यास त्यापासून वाचवण्यासाठी धावले त्यांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न केल्याने दोघांना जबर धक्का बसून जखमी झाले. हि दुर्दैवी घटना जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे घडली आहे.

योगेश बळीराम जायभाय असे या मयत तरुणाचे नाव आहे. दरम्यान या घटनेबाबत समजले असता परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी, योगेश जायभाय हा पहाटे सहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे उठून शौचालायास जात असताना घराजवळील विद्युत खांबावरील तार तुटून खाली पडलेली होती. ती त्याने पहिली नाही.

या तारेवर त्याचा पाय पडल्याने शॉक बसला त्यामुळे तो मोठ्याने ओरडला. त्यावेळी त्याचे वडील बळीराम व भाऊ गोकुळ यांनी त्यास ओढण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांना विजेचा शॉक बसला व ते खाली पडले.

यावेळी वडील बेशुद्ध पडले तर गोकुळ याचा हात भाजला. यावेळी शेजारील नातेवाईक यांनी दोरीच्या सहायाने तार बाजूला करून योगेश यास जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts