Tips And Tricks : काही वस्तू लवकर गंजतात त्यामुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्येला सामोरे जावे लागते. खासकरून लोखंडी वस्तू लवकर गंजल्या जातात. पाण्याच्या संपर्कात आल्याने या वस्तूंवर खूप लवकर गंज चढतो. यात नळांचा समावेश आहे.
कारण नळ हे पाण्याच्या संपर्कात आल्याने त्यावर गंज चढतो. खारट पाण्यामुळेही नळ खराब होतात. जर तुम्हीही गंजलेल्या नळामुळे त्रस्त असाल तर काळजी करू नका. तुम्ही आता घरच्या घरी काही मार्गांनी नळांवर असणारा गंज काढू शकता. ते ही काही मिनिटातच.
फॉलो करा या टिप्स
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरा
जर तुम्ही बेकिंग सोडा आणि व्हिनेगर वापरले तर तुमच्या बाथरूमच्या नळातील गंज निघून जाईल. तुम्हाला अगोदर हे दोन्ही मिक्स करून नंतर मिश्रण तयार करावे लागणार आहे. त्यानंतर, ब्रशच्या मदतीने ते गंजलेल्या भागावर लावून घासून घ्या. त्यामुळे गंज दूर होईल.
लिंबू आणि गरम पाणी
तसेच तुम्ही लिंबू आणि गरम पाणी वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला अगोदर लिंबू आणि गरम पाण्याचे मिश्रण नळावर लावून थोडावेळ सोडावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला दिसेल की हा गंज बर्याच प्रमाणात गेला आहे.
बेकिंग सोडा
बेकिंग सोड्याने गंज काढता येईल. सर्वात अगोदर थोडे लिंबू घ्या, मग गंज काढणे सोपे होईल. तुम्हाला अगोदर एकूण 3 चमचे बेकिंग सोडा आणि दोन चमचे लिंबाचा रस पाण्याच्या मदतीने मिसळावा लागेल.
त्यानंतर, तुम्हाला फक्त हे तयार मिश्रण गंजलेल्या भागावर लावून एकूण 10 मिनिटे असेच राहू द्या. त्यानंतर तुम्हाला नळ चांगला चोळून स्वच्छ करावा लागणार आहे. तुमच्या नळाचा गंज निघून जाईल.