अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2022 Maharashtra Politics :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुडीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर त्यांच्या आवाहनानुसार कार्यकर्त्यांनी मुंबईत पहिली कृती केली.
मात्र, पोलिसांनीही तेवढ्याच तत्परतने कारवाई केली. आता या कारवाईचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मेळाव्यात बोलताना ठाकरे यांनी मस्जिदींवरील भोंग्यावर भाष्य केले होते. हे भोंगे उतरवावेच लागतील. भोंगे काढले नाही तर मस्जिदींसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू, असा इशारा त्यांनी दिला होता.
त्यानुसार मुंबईतील चांदिवलीत मनसे पदाधिकारी महेंद्र भानुशाली यांनी आज सकाळी त्यांच्या कार्यालयाबाहेर हनुमान चालिसाचे भोंगे लावले.
यावरून पोलिसांनी सुरवातीला त्यांना समज दिली. तरीही भोंगे बंद न केल्याने अखेर पोलिसांनी मनसेच्या कार्यालयाबाहेर लावलेले भोंगे उतरवले आणि महेंद्र भानुशाली यांनी ताब्यात घेतले.
परवानगी न घेता भोंगे लावल्याने केल्याचे पोलिसांनी सांगितले. आता यावरून मनसेकडून सत्ताधारी पक्षावर आरोप सुरू झाले आहेत.