ताज्या बातम्या

शिंदे-फडणवीस सरकारची पहिली क्लीन चीट, या व्यावसायिकाला मिळाला दिलासा

Maharashtra news:नव्याने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आधीच्या ठाकरे सरकारचे अनेक निर्णय फिरविण्याचा सपाटाच सुरू केला आहे.

त्यानंतर आता ठाकरे सरकारमध्ये अडचणीत सापडलेल्यांना क्लीन चीट देण्यासही सुरूवात झाल्याचे दिसून येते. ईडीची भीती दाखवून मुंबईतील बांधकाम व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याचा आरोप असणारे जितेंद्र नवलानी यांना याचा पहिला दिलासा मिळाला आहे.

विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सुरु असलेली नवलानी यांची चौकशी गुंडाळण्यात आली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारपरिषदेत जितेंद्र नवलानी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.

नवलानी आणि त्यांच्या इतर साथीदारांनी विविध खासगी कंपन्यांकडून ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून सन २०१५ ते २०२१ या कालावधीत तब्बल ५८ कोटी ९६ लाख रुपये स्वीकारल्याचे समोर आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.

आता नव्या सरकारने पोलिसांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात अहवाल देण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत नवलानीची प्राथमिक चौकशी रद्द करण्याची याचिका निकाली काढली.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts