पालकमंत्री म्हणाले… वाझे प्रकरणामुळे सरकार अडचणीत येणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- राज्याचे ग्रामविकास मंत्री तसेच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर आले होते.

यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच यावेळी त्यांनी राज्यात सध्या चर्चेत असलेले वाझे प्रकरणावर भाष्य केले.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले कि, वाझे प्रकरणामुळे महाविकास आघाडी अडचणीत येणार नाही, एटीएस या संदर्भामध्ये तपास करत असताना

तो ऐन वेळेला एनआयए कडे देण्यात का आला? परमवीर सिंग यांच्याकडे संशयाची सुई येत असल्याने सिंगांना माफीचा साक्षीदार करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न भाजपने करायला सुरुवात केली आहे,

असा आरोप मुश्रीफ यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, वाझे प्रकरणामुळे महाविकासआघाडी मध्ये कोणतीही अडचण येणार नाही.

अंबानींच्या घरासमोर शस्त्रसाठा का ठेवला, याचा मास्टरमाईंड कोण आहे, मनसुख हिरन यांची हत्या कशामुळे झाली याचा उलगडा व्हायला पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts