अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- राज्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करीत आहे. अशा प्रकारे प्रत्येक ग्रामपंचायतीने देखील गट तट विसरुण राजकारण बाजूला ठेवून एकत्रित आल्यास प्रत्येक गावाचा विकास करणे सहज शक्य असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
जिल्हा परिषद वार्षिक योजनेअंतर्गत डाऊच खुर्द येथे बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण व चांदेकसारे येथे बांधण्यात येणाऱ्या प्राथमिक शाळा इमारतीचे भूमिपूजन आमदार काळे यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी ते बोलत होते. आमदार काळे म्हणाले, साडेचार वर्षांपूर्वी विकास करण्याच्या बाबतीत माझ्यावर विश्वास दाखवून ग्रामीण भागातील जनतेने मोठ्या विश्वासाने दिलेली जबाबदारी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांनी समर्थपणे पार पाडून संपूर्ण कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत.
तोच विश्वास विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील जनतेने पुन्हा एकदा माझ्यावर दाखवला. माझ्यावर दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून मतदार संघातील आरोग्य, शिक्षण रस्ते पाणी आणि वीज या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य देऊन या प्रश्नांना दिले आहेत.
संपूर्ण मतदार संघाचा प्रतिनिधी या नात्याने मतदार संघाचा अतिशय महत्त्वाचा गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावला.
वर्षानुवर्षापासून झालेली गोदावरी कालव्यांची दुरवस्था झाल्यामुळे वहनक्षमता कमी होऊन शेतीला वेळेवर आवर्तनाचा लाभ मिळत नव्हता. आता तो मिळणार आहे, असेही आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले.